Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्र15 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; हवामान विभागाने दिली माहिती आहे

15 ऑगस्टनंतर महाराष्ट्रात पुन्हा वाढणार पावसाचा जोर; हवामान विभागाने दिली माहिती आहे

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात खूप जास्त पाऊस पडला. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस (Mansoon Update) झाला. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. यावर्षी पाऊस देखील चांगला पडल्याने अनेक नद्यांमध्ये धरणांमध्ये पाणी साठ्यात देखील वाढ झालेली आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दल त्याचबद्दल धरणांच्या पाणी पातळीबद्दल नेहमीच माहिती देत असतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत 29 टक्के जास्त पाऊस झालेला आहे. तर 15 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून आलेली आहे.

 

पावसाचा जोर वाढणार |

 

सध्या महाराष्ट्रमध्ये पावसाचा जोरात अत्यंत कमी झालेला आहे. परंतु आता 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण वाढण्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. 22 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. आणि ऑगस्ट महिन्याचा संपेपर्यंत हा पावसाचा जोर असाच राहणार आहे. हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता नाही. परंतु अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे.

 

यावर्षी समाधानकारक पाऊस (Mansoon Update) पडल्याने पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक धरणे दरवर्षीपेक्षा जास्त भरलेली आहेत. यावर्षी भाटघर, वीर आणि उजनी ही धरणे जवळपास 100% भरलेली आहे. त्याचप्रमाणे मीरा देवघर हे धरण 97.20% भरलेले आहे. चाकसमान हे धरण 99.2% भरलेले आहे. पवना हे धरण 95.27% दर भरलेले आहे. त्याचप्रमाणे खडकवासला हे धरण 81.43% भरलेले आहे. तसेच पानशेत ते धरण 99.13 टक्के भरलेले आहे. या धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने या धरणांमधून निसर्ग देखील सुरू आहे. त्यामुळे मुळा, मुठा, भीमा, मीरा या नद्यांच्या पात्रात देखील पाण्याची आवक वाढलेली आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जी धरणे आहेत त्यांच्यात देखील पाण्याची पातळी चांगली आहे. या ठिकाणी धरणे जवळपास 80% पर्यंत भरलेली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -