ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर कामावरून कमी केल्याच्या रागातून कंत्राटी कर्मचाऱ्याने आर. के. नगर येथील ग्रामीण विभागांतर्गत कार्यालयात घुसून तोडफोड केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माघारी येऊन गोंधळ घालून शिवीगाळ केली. कामावर पुन्हा न घेतल्यास बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी आदित्य प्रदीप देसाई (वय २५, रा. फिल्टर हाऊस पाचगाव) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महावितरणच्या आर. के. नगर येथील कार्यालयात कामासाठी असताना संशयीत हा अनियमितपणा, हलगर्जीपणाने वागत होता. त्यामुळे त्याला सप्टेंबरमध्ये कामावरून कमी केले होते. आपणास पुन्हा कामावर घ्यावे, यासाठी काही दिवसांपासून तो प्रयत्न करत होता. बुधवारी सायंकाळी तो कार्यालयात आला. खिडकीवर हाताचे ठोसे मारून काचा फोडल्या. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकत नव्हता. वरिष्ठ अधिकारी विठ्ठल चौगुले यांना आताच्या आता कार्यालयात बोलावून घ्या, अन्यथा कार्यालयातील सर्व साहित्य फोडून टाकतो, अशी धमकी देत होता. काही कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मला कामावर घ्या, अन्यथा बघून घेण्याची धमकीही त्याने दिली.
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाची तोडफोड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -