Saturday, December 21, 2024
Homeदेश विदेश‘स्वातंत्र्य मिळालं पण मायबाप कल्चरचा सामना…’ काय म्हणाले पीएम मोदी?

‘स्वातंत्र्य मिळालं पण मायबाप कल्चरचा सामना…’ काय म्हणाले पीएम मोदी?

देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा केला जातोय. देशाला खूप परिश्रम आणि यातना सोसून, संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. देशाच्या लाखो नागरिकांनी अतिशय संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळवलं आहे. त्यामुळे आजचा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशासाठी जास्त महत्त्वाचा आहे. शिंदे सरकारकडून राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवला जात आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. मोदी यावेळी काय बोलणार? याकडे देशाचं विशेष लक्ष असणार आहे.

 

मध्यमवर्गीयांबद्दल पीएम मोदी काय म्हणाले?

मध्यमवर्गीय देशाला भरपूर काही देतो. त्यामुळे देशाची पण त्याच्याप्रती जबाबदारी आहे. मी स्वप्न बघितलय 2047 पर्यंत लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. गरज असेल तेव्हा सरकार तिथे असेल असं पीएम मोदी म्हणाले.

स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत – पीएम मोदी

“स्पेस सेक्टर एक भविष्य आहे. महत्त्वाचा पैलू आहे. स्पेस सेक्टरमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक स्टार्टअप येत आहेत. आम्ही दूरगामी विचार करुन स्पेस सेक्टर मजबूत करत आहोत. आज प्रायवेट रॉकेट लॉन्च होत आहेत. उपग्रह सोडले जात आहेत. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या. त्याबरोबर दोन गोष्टी अजून झाल्या. त्यामुळे विकासाला गती मिळाली. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरच निर्माण आणि सामन्य माणसासाठी इज ऑफ लिव्हिंगवर भर दिलाय” असं पीएम मोदी म्हणाले.

‘स्वातंत्र्य मिळालं पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला’

“बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण लोकांना मायबाप कल्चरचा सामना करावा लागला. सतत सरकारकडे मागावं लागायचं. आम्ही गर्व्हन्सच हे मॉडल बदललं. आज सरकार स्वत: लोकांपर्यंत जातय” असं पीएम मोदी म्हणाले.

 

‘देशवासियांचा हा विश्वास अनुभवातून आला’

“2047 पर्यंत विकसित भारताच स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टी सुचवल्या आहेत. माझ्या देशवासियांनी हे सुचवलं आहे, म्हणून मी ते वाचलं. देशवासियांची इतकी मोठी स्वप्न आहेत. देशवासियांचा हा विश्वास अनुभवातून आला आहे. लाल किल्ल्यावरुन देशातील 18 हजार गावात वीज पोहोचणार असं सांगितलं जातं आणि वीज तिथे पोहोचते त्यावेळी विश्वास दृढ होतो” असं पीएम मोदी म्हणाले.

 

‘2047 साली विकसित भारताचा स्वप्न साकार करु शकतो

“आज आपण 140 कोटी आहोत. जर 40 कोटी भारतीय गुलामीची बेडी तोडू शकतात. 40 कोटी लोक स्वातंत्र्याच स्वप्न पूर्ण करु शकतात, तर 140 कोटी लोक संकल्प घेऊन निघाले, एक दिशा ठरवून निघाले, तर आव्हान कितीही असोत, प्रत्येक आव्हानाला पार करुन समृद्ध भारत बनवू शकतो 2047 साली विकसित भारताचा स्वप्न साकार करु शकतो” असं पीएम मोदी म्हणाले.

 

‘नैसर्गिक संकटांनी चिंता वाढवली’

नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांची चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपली जवळची माणस गमावली आहेत. आज मी त्या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. मी त्यांना विश्वासाने सांगतो, हा देश संकटकाळात त्यांच्यासोबत आहे, असं पीएम मोदी म्हणाले.

 

लाल किल्ल्यावर ध्वजारोहण संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं आहे. आज देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आहे.

 

राहुल गांधी लाल किल्ल्यावर दाखल

काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते कुमार स्वामी सुद्धा सहभागी होण्यासाठी लाल किल्ल्यावर दाखल झाले आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले असून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीएम मोदींच स्वागत केलं. आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्याची पीएम मोदी यांची 11 वी वेळ आहे.

 

पीएम मोदी राजघाटवर पोहोचले

पीएम मोदी राजघाटवर पोहोचले आहेत. त्यांनी इथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. पीएम मोदी त्यानंतर लाल किल्ल्यावर रवाना होतील. तिथे लाल किल्ल्याच्या प्राचीरवरुन देशाला संबोधित करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन मोठी घोषणा करणार?

देशासाठी आज खूप मोठा दिवस आहे. आजच्याच दिवशी 78 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. ब्रिटिशांनी आजच्याच दिवशी भारत देश सोडून पलायन केलं होतं. ब्रिटश सरकारने भारतीय नागरिकांवर खूप जुलूम आणि अत्याचार केले होते. त्या अत्याचारांच्या विरोधात भारताच्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला होता. त्यामुळे आपण आज देशात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. आजचा दिवस देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या अशा लाखो स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्याचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिल्लीत लाल किल्ल्यावर भव्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी मोदी आपल्या भाषणात देशासाठी काही मोठी घोषणा करतात का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

 

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई

इंदापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावर तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना उजनी धरणावर लेजर शो करून पाण्यावर केसरी, पांढरा आणि हिरव्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7.17 वाजता लाल किल्ल्यावर पोहोचतील.

यानंतर 7:19 वाजता गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल.

पंतप्रधान मोदी सकाळी 7.28 वाजता लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पोहोचतील.

मोदी यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता राष्ट्रध्वज फडकवला जाईल.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 7:33 वाजता देशाला संबोधित करतील.

देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस आज साजरा केला जातोय. देशाला खूप परिश्रम आणि यातना सोसून, संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. देशाच्या लाखो नागरिकांनी अतिशय संघर्ष करुन हे स्वातंत्र्य मिळवलं आहे. त्यामुळे आजचा स्वातंत्र्य दिवस संपूर्ण देशासाठी जास्त महत्त्वाचा आहे. शिंदे सरकारकडून राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवला जात आहे. नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. मोदी यावेळी काय बोलणार? याकडे देशाचं विशेष लक्ष असणार आहे. कारण मोदी यांच्या नेतृत्वात देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार देशात स्थापन झालं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाचा प्रत्येक नागरिक या स्वातंत्र्य दिनाच्या आनंदोत्सवात न्हाऊन निघणार आहे.

स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एथलीट रवाना

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेलं भारताचं ऑलिम्पिक पथक 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाल किल्ल्यावर रवाना झालं आहे.

 

पीएम मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

पीएम मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

असं त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -