Sunday, December 22, 2024
Homeराशी-भविष्य१८० वर्षांनी रक्षाबंधनाला दुर्मिळ योग बनल्याने लक्ष्मी सोनपावलांनी ‘या’ ५ राशींच्या घरी...

१८० वर्षांनी रक्षाबंधनाला दुर्मिळ योग बनल्याने लक्ष्मी सोनपावलांनी ‘या’ ५ राशींच्या घरी येणार? धनाने भरु शकते झोळी

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचा मानला जातो. हिंदू पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन ही तिथी १९ ऑगस्टला साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या रक्षाबंधनाला ग्रह-ताऱ्यांची स्थिती अशी आहे की एक नाही तर अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा शुभ संयोगांचा दुर्मिळ संयोग सुमारे १८० वर्षांनंतर होत आहे. सर्वप्रथम, श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी होत आहे. १९ ऑगस्टला असलेल्या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन आणि श्रावणी सोमवार आहे. तसेच या रक्षाबंधनाच्या दिवशी बुधादित्य योग, शुक्रादित्य योग, लक्ष्मी नारायण योग, शशयोग इत्यादी योग तयार होत आहेत.

या योगांचा सर्व १२ राशींवर परिणाम होईल. भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण रक्षाबंधन पाच राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी राखीचा सण खूप खास असेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी रक्षाबंधन शुभ ठरू शकते.

 

‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार?

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा हा सण शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. विशेषत: व्यापारी वर्गाला रक्षाबंधनाचा सण मोठा आर्थिक लाभ देऊ शकतो. त्यांच्या व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.

 

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा हा सण भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असू शकतो. या राशीच्या मंडळींना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नातेसंबंध सुधारु शकतात. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

 

मिथुन राशी

रक्षाबंधनाचा हा सण मिथुन राशीच्या लोकांसाठी सुखद बातमी घेऊन येणारा ठरु शकतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांना काही विशेष काम पूर्ण करून फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मान-प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

 

कन्या राशी

आजची ग्रहस्थिती कन्या राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरू शकते. नोकरीचे प्रश्न सुटतील. पद आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. उत्पन्न वाढू शकते. कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकते.

 

कुंभ राशी

रक्षाबंधनाचा दिवस कुंभ राशीच्या लोकांना नवीन भेट देऊ शकतो. व्यावसायिकांना या काळात भरपूर नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना बनू शकते. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -