Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसारा – सुशांत यांच्यासाठी ‘हा’ दिवस असता खास, लग्नापर्यंत पोहोचलं होतं नातं?...

सारा – सुशांत यांच्यासाठी ‘हा’ दिवस असता खास, लग्नापर्यंत पोहोचलं होतं नातं? मोठं सत्य समोर

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांची पहिली भाट दिग्दर्शक करण जोहरच्या घरी झाली. त्यानंतर ‘केदारनाथ’ सिनेमात सारा – सुशांत यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. मोठ्या पडद्यावरील सारा – सुशांत यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रिअल लाईफमध्ये देखील सारा – सुशांत यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. सिनेमानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.

 

 

सुशांत सिंह राजपूत याच्या लोनावळ्यातील फार्महाउसच्या केअरटेकर रईस याने IANS ला अभिनेत्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली होती. सुशांतच्या मनात सारा हिच्यासाठी प्रचंड प्रेम होतं. अभिनेता साराला जानेवारी 2019 मध्ये प्रपोज देखील करणार होता.

 

केअरटेकर रईस याने दिलेल्या माहितीनुसार, 2018 पासून सारा, सुशांत याच्या फार्महाऊसवर जायची. पण 2019 नंतर अचानक सारा हिचं येणं बंद झालं. ‘सारा खूप चांगली मुलगी आहे. तिने कधीच सुशांतच्या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केलं नाही. किंवा अभिनेत्री म्हणून ती कधीच राहिली नाही. हाउसहेल्पला सारा मावशी म्हणून हाक मारायची…

 

रईस याने केलेल्या दाव्यानुसार, 21 जानेवारी 2019 मध्ये वाढदिवसादरम्यान सुशांत, सारा हिला प्रपोज करणार होता. लग्नपर्यंत नातं पोहोचणार होतं की नाही… याबद्दल काही माहिती नाही. सुशांत याने साराला प्रपोज करण्यासाठी प्लानिंग देखील केली होती. परदेशात सुशांत, साराला प्रपोज करणार होता. शिवाय त्याने सारासाठी गिफ्ट देखील मागवलं होतं. पण असं काही झालं नाही… असं देखील सुशांतच्या फार्महाऊसचा केअरटेकर रईस म्हणाला.

 

सारा हिला प्रपोज करणार आलं… असं सुशांतने त्याच्या मित्रांना देखील सांगितलं होतं. पण अभिनेता लग्नासाठी विचारणार होता की नाही… हे माहिती नाही… असं देखील रईस म्हणाला. सुशांत याच्या निधनानंतर सारा हिच्यासोबत अभिनेत्याचं असलेलं नातं समोर आलं.

 

सुशांत याच्या निधनांतर सारा हिची देखील चैकशी करण्यात आली. तेव्हा साराने सुशांत याच्यासोबत असलेलं नातं मान्य केलं. पण सुशांत कधीच नात्यात निष्ठावंत नव्हता. म्हणून आमचं ब्रेकअप झालं… असं देखील सारा चौकशी दरम्यान म्हणाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -