पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात अत्यंत भयानक घटना घडली आहे. काही शस्त्र सज्ज लोकांनी ट्रक आणि बसमधून लोकांना उतरवलं. त्यांची ओळख पटवली व त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात आतापर्यंत 23 लोक ठार झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यावर पंजाब सरकारची रिएक्शन समोर आली आहे. मुसाखेलामध्ये पंजाब प्रांताच्या लोकांना टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला, असं पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्या आजमा बुखारी यांनी सांगितलं. याआधी एप्रिल महिन्यात नोशकी जवळ एक बसमधून नऊ यात्रेकरुना उतरवण्यात आलं. त्यांचं आयडी कार्ड तपासल्यानंतर गोळी मारुन त्यांची हत्या करण्यात आली होती.
मुसाखेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त नजीब काकर यांनी माहिती देताना सांगितलं की, “शस्त्रसज्ज लोकांनी सर्वसामान्यांवर फक्त गोळ्याच चालवल्या नाहीत, तर 10 गाड्यांना आग लावली” पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत आहेत. बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हत्याकांडाचा निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या.
का करण्यात आली हत्या?
याआधी एप्रिल महिन्यात अशाच प्रकारे काही लोकांवर हल्ला झाला होता. बेछूट गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात बलूचिस्तानच्या केच जिल्ह्यात पंजाबच्या 6 मजुरांची हत्या करण्यात आली होती. या सर्व हत्या टार्गेट करुन करण्यात आल्याच पोलिसांनी सांगितलं होतं. मरण पावलेले सगळे लोक पंजाबच्या वेगवेगळ्या भागातील होते. जातीय बॅकग्राऊंडमुळे त्यांची निवड करण्यात आली होती.
यापूर्वी असं हत्याकांड कधी झालय?
यावर्षी एप्रिल आणि मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्येच ही घटना झालेली नाही. वर्ष 2015 मध्ये सुद्धा असच घडलय. त्यावेळी शस्त्रसज्ज लोकांनी 20 मजुरांची हत्या केली होती. हे सगळे पंजाबचे राहणारे होते.