Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंगजपान टू पंजाब… वडिलांच्या शोधात सातासमुद्रापार आला, 20 वर्षांनी उघड झालं सत्य…

जपान टू पंजाब… वडिलांच्या शोधात सातासमुद्रापार आला, 20 वर्षांनी उघड झालं सत्य…

रक्ताच्या नात्यांचा शोध लावायचाच असं जर कोणी ठरवलं तर एखादी व्यक्ती जगाच्या कुठल्याही कामाकोपऱ्यात असली तरी त्यांचा शोध घेतला जाऊच शकतो.. पंजाबच्या अमृतसरमधून अशीच एक डोळे पाणावणारी कहाणी समोर आलीये, जी एखाद्या चित्रपटापेक्षा काही कमी नाही. तेथे एक मुलगा त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी सातसमुद्रापर आला.आपल्या वडिलांना शोधत शोधत तो जपानहून पंजाबला आला. तब्बल 20 वर्षांनी पिता-पुत्रांची झालेली ही भेट अतिशय भावूक करणारी होती. त्यासाठी त्याने रक्षाबंधनाचा दिवस निवडला.

कॉलेज असाइनमेंट करण्यासाठी भारतात आला अन्…

रिन हा जपानच्या ओसाका विद्यापीठातून शिक्षण घेत आहे. तेथे त्याला एक असाइनमेंट देण्यात आली होती, जी पूर्ण करण्यासाठी त्याला भारतात यायचे होते. याच संधीचा फायदा घेऊन त्याने पल्या वडिलांना भेटण्याचे ठरवले आणि तो पंजाबला पोहोचला. रिनसाठी अमृतसरपर्यंत पोहोचणं थोडं सोपं होतं, पण तिथे पोहोचल्यावर रस्त्यांवरून भटकून वडिलांचं घर शोधणं अवघड होतं. पण जिथे इच्छा तिथे मार्ग असं म्हटलं जातं. अखेर बराच शोध घेऊन त्याने वडिलांचं घर शोधलंच. रिनच्या आईने त्याला त्याचा वडिलांचे काही जुने फोटो आणि इतर काही वस्तू दिल्या होत्या, ज्यामुळे रिनला तिथे पोहोचण्यास मदत झाली.

थायलंडमध्ये झालं प्रेम आणि लग्न

मूळचा भारतीय असलेला सुखपाल थायलंडमध्ये गेला, तेथे साचीच्या प्रेमात पडला होता आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि काही काळानंतर रिनचा जन्म झाला. मात्र 5 वर्षांच्या संसारानंतर सुखपाल आणि साची यांच्यात भांडणे सुरू झाली आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. साचीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुखपाल भारतात परतले. येथे आल्यावर त्यांनी दुसरे लग्न केले आणि आता त्याला एक मुलगी देखील आहे. रिनची भेट झाल्यावर तिलाही खूप आनंद झाला.

तर सुखपालच्या दुसऱ्या पत्नीनेही पतीच्या या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आमची मुलगी तिच्या भावासाठी आसुसली होती आणि देवाने तिला राखीच्या दिवशी भावाची भेट दिली आहे, आज तिने भावाला राखी बांधून राखीचा सण साजरा केला. जर सुखपालला त्याच्या पहिल्या पत्नीशी फोनवर बोलायचे असेल आणि ते तसे करू शकत असेल, तर तिची काही हरकत नाही,असेही तिने नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -