Sunday, February 23, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक! रेनकोटवरून भांडण, सपासप चाकूने वार; डिलिव्हरी बॉयने मित्राला संपवलं

धक्कादायक! रेनकोटवरून भांडण, सपासप चाकूने वार; डिलिव्हरी बॉयने मित्राला संपवलं

पुण्यातील सिंहगड रोड भागातील नऱ्हे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोटात चाकू खुपसून खून केल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पुण्यातील सिंहगड रोड भागात मोठी खळबळ उडाली होती.

 

रेनकोटवरून भांडण झालं

 

या घटनेत आदित्य वाघमारे, असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव (Pune Crime News) आहे. सुरेश भिलारे या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश हे दोघे ही मित्र होते. दोघेही सकाळी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये काम करायचे आणि संध्याकाळी एका शॉपिंग वेबसाईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. दोघंही मूळचे बीड जिल्ह्याचे असून गेल्या एक महिन्यापासून एकमेकांसोबत त्यांची ओळख झाली होती.

 

डिलिव्हरी बॉयने केला मित्राचा खून

 

काल २५ ऑगस्ट रोजी दुपारी त्या दोघांमध्ये रेनकोट वरून वाद झाला (Crime News) होता. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांनी रात्री नऱ्हे भागात भेटण्यासाठी ठरवलं. रात्री साडे दहा वाजता ते दोघेही भेटले. मात्र, वाद मिटण्याऐवजी त्यांच्यात अजून भांडण वाढलं (Killed Friend) होतं. दरम्यान, भिलारेने त्याच्याकडील असलेला चाकू वाघमारेच्या पोटात खुपसला. या हल्ल्यात वाघमारे जखमी झाला आणि उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

 

सिंहगड परिसरातील घटना

 

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू (Delivery Boy Killed Friend) आहे. केवळ एका रेनकोटवरून मित्राने मित्रालाच संपवल्याची घटना पुण्यातून समोर आलीय. या घटनेमुळे मात्र पुणं चांगलंच हादरलं आहे. मागील काही दिवसांत पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वर गेलाय. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलंय. पुणे पोलीस गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु अशा घटनांमुळे पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -