Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रधनंजय पवारच्या कुटुंबाचा बिग बॉसला थेट सवाल: “आमचा धनंजय कुठे गायब आहे?”

धनंजय पवारच्या कुटुंबाचा बिग बॉसला थेट सवाल: “आमचा धनंजय कुठे गायब आहे?”

बिग बॉस मराठी'(big boss)च्या घरात यंदाच्या पर्वात धुमाकूळ घालणाऱ्या स्पर्धकांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पवार, उर्फ डीपी, याचं नाव चर्चेत आहे. कोल्हापूरचा हा तरुण स्पर्धक त्याच्या हटके स्टाइल आणि विनोदी डायलॉग्समुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मात्र, धनंजयचा चाहता वर्ग आणि त्याच्या कुटुंबीयांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे – धनंजयला मुख्य भागात का दाखवले जात नाही?

 

धनंजयची आई आणि पत्नी, कल्याणी, यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी बिग बॉसच्या टीमवर थेट प्रश्न उपस्थित केला आहे. “आमचा धनंजय खेळात चांगलेच सक्रिय आहे, परंतु तो मुख्य भागात दिसत नाही,” असे त्यांनी सांगितले. “अनसीन अनदेखा” या बिग बॉसच्या विशेष सेगमेंटमध्ये धनंजयचे फुटेज दिसते, परंतु मुख्य भागात त्याला पुरेसं महत्व का दिलं जात नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

 

धनंजयची पत्नी कल्याणी म्हणाली, “आमचा धनंजय एक उत्तम एंटरटेनर आहे, आणि तो प्रेक्षकांना खूप आवडतो. मग त्याला मुख्य एपिसोडमध्ये का कमी दाखवतात?” त्यावर धनंजयची आई म्हणाली, “धनंजय जो काही बोलतोय ते प्रेक्षकांनी पाहिले पाहिजे. त्यामुळे आम्ही बिग बॉसच्या टीमला हे लक्षात घेण्याची विनंती करतो.”

 

धनंजय पवारचे कुटुंबीय या मुद्द्यावर ठाम आहेत की त्याचा खेळ, विचार, आणि मनोरंजन प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आता बिग बॉस या प्रतिक्रियेवर काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -