टेक कंपनी Infinix आज त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Infinix Zero 40 5G लाँच (new launch)करणार आहे. या सिरीजमध्ये आज दोन ब्रँडेड स्मार्टफोन सादर केले जाणार आहेत. ज्यामध्ये Infinix Zero 40 5G आणि Zero 40 4G यांचा समावेश असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा, पावरफुल बॅटरी आणि अनेक भन्नाट फीचर्स मिळणार आहेत.
Infinix Zero 40 5G सिरीजमधील Infinix Zero 40 5G आणि Zero 40 4G स्मार्टफोन्सचा लाँचिंग(new launch) ईव्हेंट कंपनीच्या अधिकृत युट्यूब अकाऊंटवर लाईव्ह दाखवला जाऊ शकतो. लाँचिंगपूर्वी दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
डिस्प्ले
Infinix Zero 40 सिरीजमधील दोन्ही फोनमध्ये 6.78-इंचाचा LTPS AMOLED डिस्प्ले असू शकतो, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण असेल, जे फोनचे स्क्रॅचपासून संरक्षण करेल.
प्रोसेसर
फोनमध्ये MediaTek चा Dimension 8200 Ultimate प्रोसेसर असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच यामध्ये 12 GB LPDDR5X रॅम देखील उपलब्ध असेल. Infinix Zero 40 4G मध्ये MediaTek चा Helio G100 प्रोसेसर फोनमध्ये मिळू शकतो.
रॅम आणि स्टोरेज
दोन्ही फोनमध्ये 12GB चा स्टोरेज दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये 256GB आणि 512GB पर्याय स्टोरेज मिळू शकतो. Infinix Zero 40 4G मध्ये 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असेल.
बॅटरी
Infinix Zero 40 सिरीजमधील दोन्ही फोनमध्ये पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. Infinix Zero 40 5G मध्ये 5,000mAh बॅटरी असेल, जी 45W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. यासोबतच 20W वायरलेस आणि 10W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग दिली जाईल.
कॅमेरा
Infinix Zero 40 5G मध्ये 108MP ISOCELL HM6 सेन्सर दिला जाऊ शकतो. हे ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक ईमेज कॅप्चर करताना स्थिरीकरणास समर्थन देईल. या स्मार्टफोनमध्ये 50 MP अल्ट्रा-वाइड आणि 2 MP डेप्थ कॅमेरा देखील असू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 50 MP सेन्सर असेल.
फीचर्स
Infinix Zero 40 स्मार्टफोन सीरीज नवीनतम Android 14 वर आधारित असेल. धूळ आणि पाण्याच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी याला IP54 रेटिंग मिळाले आहे. फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट कॅमेरा असेल आणि स्पीकरमध्ये JBL ट्यून दिले जाईल.
कलर पर्याय
Infinix Zero 40 4G हे प्रारंभिक मॉडेल आहे, जे मिस्टी एक्वा, ब्लॉसम ग्लो, रॉक ब्लॅक रंगांमध्ये आणले जाईल. तर Infinix Zero 40 5G व्हायलेट गार्डन, मूव्हिंग टायटॅनियम, रॉक ब्लॅक रंगांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
किंमत
Infinix Zero 40 4G ची किंमत 279 डॉलर म्हणजेच सुमारे 23,425 रुपये असू शकते. तर Infinix Zero 40 5G ची किंमत 399 डॉलर म्हणजेच सुमारे 33,500 रुपये असू शकते.