Thursday, September 19, 2024
Homeतंत्रज्ञानचाळा अंगाशी आला… गुगलवर तिचा नंबर मिळाला, फोन लावला आणि… रिटायर्ड आजोबांचं...

चाळा अंगाशी आला… गुगलवर तिचा नंबर मिळाला, फोन लावला आणि… रिटायर्ड आजोबांचं पुढे काय झालं?

रिकामटेकडेपणा करण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर तास न् तास घालवून आपला वेळ घालवतात. काही लोक सोशलश मीडियाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करतात, काही अर्थार्जन करतात तर काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकांतपणा घालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या एका बुजुर्ग व्यक्तीला सोशल मीडिया आपलं एकटेपण घालवेल असं वाटलं. पण त्याच्याबाबत असं काही घडलं की संपूर्ण ऑनलाईन मीडिया हादरून गेला.

 

हैदराबाद येथे राहणाऱ्या एका बुजुर्ग व्यक्तीला ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हिसमुळे मोठा फटका बसला आहे. ही बुजुर्ग व्यक्ती केंद्र सरकारच्या नोकरीतून नुकतीच निवृत्त झाली होती. निवृत्तीनंतर आपलं एकटेपण दूर करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिसचा आधार घेतला. गुगलवर त्यांनी एस्कॉर्ट सर्व्हिस सर्च केलं. त्यांना एस्कॉर्ट सर्व्हिस एजन्सीची माहिती मिळाली. या एजन्सीच्या नादाला लागून या आजोबांनी दोन चार हजार नव्हे तर चक्क 5 लाख रुपये गमावले. गुगलवरील चाळा या आजोबांच्या चांगलाच अंगाशी आला.

 

तरुणींचे फोटो आले, लिस्ट आली आणि…

 

याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आजोबांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात गुगलवर एस्कॉर्ट सर्व्हिसची माहिती सर्च केली होती. त्यावेळी त्यांना गुगलवर Deepusassy Service नावाची एक एजन्सी सापडली. या एजन्सीने आजोबांनना व्हॉट्सएपवर एस्कॉर्ट सर्व्हिससाठी काही तरुणींचे फोटो आणि लिस्ट पाठवली. आजोबांनी व्हॉट्सअपवरून एजन्सीशी संवाद साधला. तेव्हा एजन्सीने त्यांना 1500 रुपये सुरुवातीची फी भरायला सांगितली. आजोबांनी राकेश अहारी नावाच्या अकाऊंटमध्ये हे पैसे ट्रान्स्फर केले आणि वाट पाहू लागले.

 

सात टप्प्यात पैसे दिले

 

त्यानंतर एस्कॉर्ट सर्व्हिस फायनल करण्यासाठी ते सतत एजन्सीच्या संपर्कात होते. रोज त्यांची वाट पाहत होते. पण काहीच घडलं नाही. असं करता करता जुलैचा शेवटचा आठवडाही आला. त्यानंतर एजन्सीने सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून किशन लाल गमेती नावाच्या अकाऊंटवर काही अगाऊ रक्कम ट्रान्स्फर करायला सांगितली. सर्व्हिस मिळेल या हेतूने रिटायर्ड आजोबांनी एजन्सीला सात टप्प्यात पैसे दिले. जेव्हा सर्व्हिस पूर्ण होईल तेव्हा तुमचे सर्व पैसे परत दिले जाईल, असं आश्वासन एजन्सीने या आजोबांना दिलं. विशेष म्हणजे त्यानंतरही कोणतीही सर्व्हिस न देता काही ना काही बहाणा करून एजन्सीने या आजोबांकडून पैसे घेतले. आज नाही तर उद्या सर्व्हिस मिळेल या हेतूने आजोबाही पैसे देत गेले. एजन्सीने सर्व्हिस चार्जच्या नावाने पाच टप्प्यात आणखी रक्कम वसूल केली. ही रिफंडेबल फी होती असं एजन्सीने सांगितलं.

 

आजोबा संतापले…

 

एजन्सीवर विश्वास ठेवून आजोबांनी पुन्हा पैसे दिले. एजन्सीला एव्हाना आजोबाची मजबुरी समजून चुकली होती. त्यामुळे काही ना काही बहाना करून एजन्सीने त्यांच्याकडून वारंवार पैसे उकळले. काही दिवसानंतर एजन्सीने पुन्हा पैसे जमा करायला सांगितलं आणि पुन्हा एकदा त्यांना रिफंडचं आश्वासन दिलं. त्यानंतर मात्र, आजोबांचा संयम सुटला. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. मला तुमची सर्व्हिसच नकोय, असं एजन्सीला रागातच सांगितलं. त्यानंतर त्यांनी एजन्सीकडे सर्व पैसे परत मागितले. पण एजन्सीने पैसे दिले नाही. उलट एजन्सीने या आजोबांना व्हॉट्सअपवर ब्लॉक केलं. त्यानंतर या आजोबांनी तात्काळ सायबर क्राईम विंगकडे जाऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -