Wednesday, July 9, 2025
Homeमहाराष्ट्रबॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा चित्रपट गेला फ्लॉप, ‘हा’ बॉलिवूड अभिनेता रडला...

बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा चित्रपट गेला फ्लॉप, ‘हा’ बॉलिवूड अभिनेता रडला ढसाढसा, तो…

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अक्षय कुमारची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये.

सतत अभिनेत्याचे चित्रपट फ्लॉप जाताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही अक्षय सक्रिय असतो आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अक्षय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय.

 

अक्षय कुमार याचा 2022 मध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटाकडून निर्मात्यांसह अक्षयलाही मोठ्या अपेक्षा होत्या. हा एक बिग बजेट चित्रपट होता. सम्राट पृथ्वीराज चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अक्षयचे चित्रपट सतत फ्लॉप जाताना दिसले. या चित्रपटामुळे नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा अक्षयला होती.

 

सम्राट पृथ्वीराजचे धमाकेदार पद्धतीने प्रमोशन करताना अक्षय कुमार दिसला. मात्र, अक्षयचा हा चित्रपट फ्लॉप गेला. सम्राट पृथ्वीराज फ्लॉप गेल्यानंतर अक्षय कुमार हा चांगलाच तुटला. हेच नाही तर चित्रपटाचे बजेट देखील बॉक्स ऑफिसवरून निघू शकले नाही. चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर अक्षयला झटका बसला.

 

सम्राट पृथ्वीराज फ्लॉप गेल्यानंतर चक्क ढसाढसा अक्षय कुमार रडला देखील. सम्राट पृथ्वीराज चित्रपट बनवण्यासाठी 300 कोटीचे बजेट लागले आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरातून 90 कोटीची कमाई केली. यामुळे चित्रपट निर्मात्यांचे अत्यंत मोठे नुकसान झाले. याचा झटका अक्षयला देखील मिळाला.

 

अक्षय कुमार याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चढउतार बघितले आहेत. काही वर्षांपूर्वीही अक्षयचे सतत चित्रपट फ्लॉप जात होते. त्यावेळी त्याने थेट विदेशात स्थायिक होत बॉलिवूडला कायमचा रामराम करत नवीन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षय कुमार हा मोठ्या संपत्तीचा मालक असून फक्त देशच नाही तर विदेशातही त्याची अत्यंत मोठी संपत्ती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -