Tuesday, November 25, 2025
Homeक्रीडाराहुल द्रविडच्या मुलाला मिळाली करियरमधील सर्वात मोठी संधी, टीम इंडियात निवड

राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली करियरमधील सर्वात मोठी संधी, टीम इंडियात निवड

फक्त भारतातीलच नाही, तर जगातील महान फलंदाजांमध्ये राहुल द्रविड यांची गणना होते. सॉलिड टेक्निक आणि संकटमोचक इनिंग्समुळे त्यांना ‘द वॉल’ची उपाधी मिळाली. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड सुद्धा क्रिकेटपटू आहे. फॅन्सना त्याच्याकडूनही भरपूर अपेक्षा आहेत. समित नुकताच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून आयोजित टी20 लीग महाराजा टी20 ट्रॉफीमध्ये खेळला.

या लीगममध्ये समित मैसूरू वॉरियर्स टीमचा भाग होता. या स्पर्धेत तो खास प्रदर्शन करु शकला नाही, पण त्याने आपल्यातल टॅलेंट दाखवून दिलं. आता समितच सिलेक्शन भारताच्या अंडर-19 टीममध्ये झालय. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या होम सीरीजमध्ये समित द्रविडला संधी दिलीय. समित पहिल्यांदा भारताच्या अंडर 19 टीमचा भाग असेल.

 

बीसीसीआयने भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीममध्ये वनडे आणि फोर डे सीरीजची घोषणा केली आहे. ही मालिका भारतातच खेळली जाणार आहे. 21 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या सीरीजमध्ये 3 वनडे आणि 2 फोर डे सामने आहेत. बीसीसीआयच्या जूनियर सिलेक्शन कमिटीने भारतीय टीमची निवड केली आहे. राहुल द्रविडचा मुलगा समितला दोन्ही सीरीजसाठी निवडण्यात आलं आहे. समित महाराजा ट्रॉफीमध्ये विशेष चमकदार कामगिरी करु शकला नाही. टुर्नामेंटमधील त्याची सर्वाधिक धावसंख्या 33 होती. सततच्या अशा प्रदर्शनामुळे त्याला नंतर प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही.

 

सीरीजच वेळापत्रक, कधी होणार सामने?

 

ऑस्ट्रेलियाची अंडर-19 टीम भारत दौऱ्यावर सर्वात आधी वनडे सीरीज खेळेल. पहिला सामना 21 सप्टेंबर, दुसरा 23 आणि तिसरा सामना 26 सप्टेंबरला होईल. फोर डे सीरीजचा पहिला सामना 30 सप्टेंबरला सुरु होईल. दुसरा सामना 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान होईल. वनडे सीरीज पुड्डचेरी येथे तर फोर डे सीरीज चेन्नईमध्ये होईल.

 

वनडे सीरीजसाठी भारताचा स्क्वॉड

 

मोहम्मद अमान (कॅप्टन), रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंह पंगालिया (विकेटकीपर), समित द्रविड, युधाजीत गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद एनान.

 

फोर डे सीरीजसाठी भारताचा स्क्वॉड

 

सोहम पटवर्धन (कॅप्टन), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, कार्तिकेय केपी, समित द्रविड, अभिज्ञान कुंडू, हरवंश सिंह पंगालिया, चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंह, आदित्य सिंह, मोहम्मद एनान

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -