Sunday, August 10, 2025
Homeमहाराष्ट्रसुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी क्रू 9 मिशनमधून कुठल्या दोन अंतराळवीरांना हटवलं?

सुनीता विलियम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी क्रू 9 मिशनमधून कुठल्या दोन अंतराळवीरांना हटवलं?

सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर नासाचे हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर कधी परतणार? या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे. पुढच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघेही पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांना SpaceX च्या ड्रॅगन कॅप्सूलने परत आणलं जाणार आहे.

 

स्पेसएक्सचे हे Crew-9 मिशन आहे. हे मिशन 24 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च होईल. आधी या मिशनमध्ये चार अंतराळवीर होते. पण आता फक्त दोनच अंतराळवीर असतील. त्यामुळे सुनीता आणि बूच यांना पृथ्वीवर परत आणता येईल.

 

सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी ज्या दोन अंतराळवीरांना Crew-9 मिशनवर पाठवण्यात येत नाहीय, त्यांच्यावर पुढच्या मिशनची जबाबदारी दिली आहे.

 

स्पेसएक्सच्या Crew-9 मिशनसाठी आधी कमांडर जेना कार्डमॅन, पायलट निक हेग, मिशन स्पेशलिस्ट स्टेफनी विल्सन आणि रशियन कॉस्मोनॉट मिशन स्पेशलिस्ट एलेक्जेंडर गोरबुनोव जाणार होते.

 

आता दोन्ही महिला अंतराळवीर जेना कार्डमॅन आणि स्टेफनी विल्सन या मिशनवर जात नाहीयत. त्यांना पुढच्या मिशनसाठी निवडण्यात आलं आहे. आधीच्या मिशनमध्ये पायलट असणारे निक हेग आता मिशन कमांडर असतील. एलेक्जेंडर यांच्या प्रोफाइलमध्ये काहीही बदल केलेला नाही. क्रू-9 मिशनच्या ड्रॅगन कॅप्सूलने ते जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -