Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजन‘यापुढे हा शो बघणार नाही’; रितेश देशमुखवर का भडकले प्रेक्षक?

‘यापुढे हा शो बघणार नाही’; रितेश देशमुखवर का भडकले प्रेक्षक?

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या सिझनचं सूत्रसंचालन पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुख करतोय. सुरुवातीला रितेशचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. ‘भाऊचा धक्का’ या त्याच्या एपिसोडलाही रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळाला होता. मात्र आता रितेशवर बिग बॉस मराठीचे प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर यापुढे हा शो बघणार नाही, असंही थेट काहींनी म्हटलंय. यामागचं कारण म्हणजे रितेश हा इतर सदस्यांना त्यांच्या वागण्यावरून ओरडताना दिसतोय. पण निक्की तांबोळीबाबत तो पक्षपात करत असल्याचं प्रेक्षकांना दिसून येतंय. ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रितेशच्या ‘भाऊचा धक्का’ एपिसोडचा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.

 

‘लोकांच्या नजरेत निक्कीची प्रतिमा चांगली बनवण्यासाठी बिग बॉस खूप मनापासून प्रयत्न करत आहे,’ असं एकाने लिहिलंय. तर ‘आम्हाला वाटतं भाऊचा धक्का म्हणजे आज जे चुकीचे वागलेत त्यांची शाळा घेणार. पण आज समजलं की निक्कीचं सगळं बरोबर असतं आणि बाकीच्यांचं चुकीच दाखवायचं. यासाठीच भाऊचा धक्का असतो,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘निक्कीसाठी बिग बॉस बनवलाय का’, असाही सवाल युजर्सनी केला आहे. ‘शो नुकताच पाहणं चालू केलं होतं, कालपासून बंद केला आहे,’ अशा शब्दांत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

 

बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धक जेव्हा चुकतात, तेव्हा त्यांची शाळा घेतली जाते. पण जेव्हा निक्की काही चुकीचं वागते, तेव्हा तिला फारसं काही म्हटलं जात नाही, अशी प्रेक्षकांची तक्रार आहे. निक्कीच्या बाबतीत ‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये पक्षपात केला जात असल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे.

 

‘बिग बॉस मराठी’चा नवीन सिझन सुरू होऊन आता 36 दिवस उलटले आहेत. बिग बॉस मराठी शोचा आता सहावा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या आठवड्यात सदस्यांची चांगलीच झोप उडाली. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून कोणताच सदस्य बाहेर पडला नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी दादा वैभव झालाय. तर जान्हवी ही निक्की आणि सूरज अरबाजच्या भूमिकेत आहे. तिघेही आपली भूमिका उत्तम वठवत आहेत. तिघांचा अभिनय पाहताना प्रेक्षकांना मात्र हसू अनावर होणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -