प्रत्येक आठवड्यात या घरात नॉमिनेशन टास्क पार पडते आणि या टास्कमध्ये घरातील प्रत्येक स्पर्धक इतर स्पर्धकांचे या घरातील स्थान कसं कमी आहे हे सिद्ध करतो आणि स्वत:ला वकहवून इतरांना नॉमिनेट करतो. अशातच सोमवारच्या भागातही बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडला आणि या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण बारा सदस्यांपैकी सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’ने नेमून दिलेल्या काही निकषांवर हा नॉमिनेशन टास्क पार पडला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ‘बिग बॉस’ने या घरातून नॉमिनेशनसाठी निर्णय क्षमता, खेळाची समज आणि मतप्रदर्शन हे तीन निकष नेमून दिले होते आणि या निकषांच्या आधारावर घरातील सर्व सदस्यांनी नॉमिनेशनचा टास्क पर पडला. सहावा आठवडा खूप कठीण असणार आहे असं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं आहे. त्यानुसार हा आठवडा कठीण असल्याचे या टास्कवरुन दिसूनही आलं. नॉमिनेशन टास्कसाठी घरातील स्पर्धकांना बाहेर जाणाऱ्या सदस्यांचे फोटो असलेले पोस्टर फाडून ते कचऱ्याच्या पेटीत टाकायचे होते.
या टास्कनुसार, अंकिताने घन:श्याम व सूरज यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर आर्याने अभिजीत व घन:श्याम यांचा उल्लेख केला. मग निक्कीने धनंजय व आर्याचे नाव घेतलं. त्यानंतर धनंजयने घन:श्याम व आर्याचं नाव घेतलं. त्यानंतर या टास्कमध्ये अरबाजने आर्या व धनंजय यांना नॉमिनेट केलं. मग घन:श्यामने आर्या व धनंजयचे नाव घेत त्यांना नॉमिनेट केलं. पुढे जान्हवीने घन:श्यामन व सूरजला नॉमिनेट केलं. मग पॅडीने अरबाज व घन:श्यामला नॉमिनेट केलं. मग वैभवने निक्की व आर्या यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर सुरजने निक्की व घन:श्याम यांना नॉमिनेट केलं.
पुढे अभिजीतने आर्या व घन:श्याम यांचे नॉमिनेशनसाठी नाव घेतलं. मग वर्षा यांनी धनंजय व सूरज यांचे नाव घेत या दोघांना नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांमधून कोण बाहेर जाणार हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.