लग्न ठरविण्यासाठी दीड लाख दिले, खर्चाला म्हणून मुलीच्या आईला ५० हजार दिले, देवळात साखरपुडा केला, दारात जोरदार लग्न केले आणि हौस म्हणून हनिमूनला गेल्यावर नवरीने दाराची कडी घालून नवऱ्याला डांबले आणि अंगावरील सोन्यासह पळून गेली. मध्यस्थांना नवरी तरी नाही तर पैसे द्या म्हटल्यावर तुम्हीच गायब केलेली मुलगी परत आणून द्या. नाही तर तुम्ही बघू घेतो म्हणून मध्यस्थांचा वराला तंबी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. या प्रकाराची नोंद रत्नागिरी ठाण्यात झाली आहे. हताश होऊन पोलिस ठाणे गाठले
मुलगी पळून गेल्याची माहिती नातवाईक एजंटला दिली. त्यांच्या मदतीने मुलाने भिलवडी आणि लातूरच्या एजंटाला भेटून मुलगी आणून देण्याचे सांगितले. काही दिवस गेल्यावर एजंटानेच आमची मुलगी तुम्हीच गायब केली असून तुमच्यामुळे पळून गेली आहे. तुम्हीच शोधून द्या, अशी धमकी मुलाला दिली. त्यानंतर मुलाने राजकीय वजन वापरायला सुरु केल्यावर भिलवडीची एजंट गायब झाला, तर लातूरच्या एजंटाने फोन बंद करून ठेवला आहे. गेले अनेक दिवस मुलीला परत आणण्याच्या प्रयत्नात असणारा नवरदेव हताश होत शेवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तूपही गेले, अशी झाली आहे. स्थानिकला मुली पाहून दमलेल्या मुलाला पन्हाळ्यातील नातेवाईक असणाऱ्या एजंटाने भिलवडीच्या एजंटाच्या मदतीने लातूरमधील मुलीचा फोटो दाखवला. मुलीला वडील नसल्याने तिच्या आईला खर्चाला ५० हजार रुपये देण्याच्या अटीवर लग्न जुळविले. मुलाने एजंटांवर विश्वास ठेवून चौकशी न करताच लातूरच्या देवळात मुलीबरोबर साखरपुडा केला. त्यानंतर मुलीला गावाकडे आणून लाखो रुपये खर्चून दारात जोरदार लग्न केले. नवदापत्य गणपतीपुळ्याला हनिमूनला गेले. तेथे नवरदेव झोपेत असताना, मुलीने रूमला बाहेरून कडी घालून दागिन्यासह धूम ठोकली. शेजाऱ्यांनी नवरदेवाची सुटका केली.