Sunday, February 23, 2025
Homeब्रेकिंगगणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता सोने आणि चांदीत मोठी घसरण, आता काय आहेत किंमती?

गणेशोत्सवापूर्वी आनंदवार्ता सोने आणि चांदीत मोठी घसरण, आता काय आहेत किंमती?

ग्राहकांना मौल्यवान धातूने मोठा दिलासा दिला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला भावात थोडा बदल झाला. पण नंतर किंमतीत मोठी उसळी घेण्यात दोन्ही धातूंना दम लागला. त्यामुळे दाम आटोक्यात राहिले. आता बाप्पाचे आगमन होत असल्याने बाजारपेठेत चैतन्य आहे. गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. मौल्यवान धातूच्या किंमतीत गेल्या आठवड्यापासून नरमाई आली आहे. आता काय आहे सोने आणि चांदीचा भाव?

 

सोन्यात घसरणीचे सत्र

 

28 ऑगस्ट रोजी सोने वधारले होते. 220 रुपयांनी सोन्याची किंमत वधारली होती. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याला भरारी घेता आलेली नाही. या दरम्यान 30, 31 ऑगस्ट, 2, 3 आणि 4 सप्टेंबर रोजी किंमतीत घसरण झाली. 1 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी किंमती 270 रुपयांनी उतरल्या. तर 5 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,830 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

चांदीची चमक फिक्की

 

27 ऑगस्ट रोजी 600 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर चांदीची चमक फिक्की पडली. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी मिळून चांदी 1500 रुपयांनी उतरली. सोमवारी भाव स्थिर होता. 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीत एकूण 2 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.

 

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

 

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,295, 23 कॅरेट 71,010, 22 कॅरेट सोने 65,306 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,471 रुपये, 14 कॅरेट सोने 41,708 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 81,337 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -