Monday, September 16, 2024
Homeतंत्रज्ञानटाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त

टाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त

टाटा कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रदीर्घ काळानंतर Tata Curve ने भारतीय बाजारपेठेत(market) प्रवेश केला आहे. टाटा कर्वे ही कार 10 लाख रुपये किमतीत बाजारात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वी आपले इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणले होते. मात्र आता Curve चे पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट बाजारात लाँच केले आहेत.

 

Tata Curve पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेनसह भारतीय बाजारपेठेत(market) आली आहे. Tata Motors ने Curve च्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9,99,990 रुपये ठेवली आहे. तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 11,49,990 रुपयांपासून सुरू झाली आहे. Tata Curve च्या DCA व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 12,49,990 रुपये ठेवण्यात आली आहे. Tata Curve च्या Hyperion GDi व्हेरिएंटची किंमत 13,99,990 रुपयांपासून सुरू होते.

 

 

टाटा कर्वची ही कार प्रीमियम कूप डिझाइनसह येते. टाटा मोटर्सच्या या कारला 500 लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या कारला 208 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. या कारमध्ये LED लाईट वापरण्यात आली आहे. यासह सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षेसाठी टाटा कर्वला 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

 

Tata Curve च्या Hyperion GDi प्रकारात व्हॉईस असिस्टेड पॅनोरामिक सनरूफचे फीचर्स आहे. या वाहनात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. कारमध्ये एरो इन्सर्टसह R17 अलॉय व्हील्स बसवण्यात आले आहेत. टाटाच्या या कारमध्ये स्वयंचलित तापमान नियंत्रणाची सुविधा आहे.

 

 

Tata Curve मध्ये क्रूझ कंट्रोल फीचर देखील समाविष्ट आहे. यासोबतच पार्किंगमध्ये सुधारणा करण्यासाठी रिव्हर्स कॅमेराही बसवण्यात आला आहे. या कारमध्ये ऑटो हेडलॅम्प बसवण्यात आले आहेत. या कारमध्ये रेन सेन्सिंग वायपर्सचाही वापर करण्यात आला आहे. टाटा मोटर्सने 2 सप्टेंबरपासून टाटा कर्वचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनी 12 सप्टेंबरपासून या कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -