Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगएसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा अन् मुख्यमंत्री म्हणाले, आता ‘लालपरी’तून बाप्पा घरात…

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा अन् मुख्यमंत्री म्हणाले, आता ‘लालपरी’तून बाप्पा घरात…

एसटी कर्मचाऱ्यांनी 5000 रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ 2021 झाली होती, त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झाली. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात 4 हजार रुपयांची भरघोस वाढ सरकारने केली आहे.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट केले आहे. ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काल आम्ही सामोपचाराने सर्वसहमत होईल असा तोडगा काढला आहे. एसटी कामगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट के.

 

यामध्ये ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काल तोडगा काढला, त्यामुळे आता कोंकणासह राज्यभरात गणरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसमोरचा मोठा अडथळा दूर झाला आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आपल्या या लालपरीमधूनही काही गणपती बाप्पा घरात येतात. त्यांच्या आगमनाची तयारी उत्साहाने आपल्याला करता येईल. आमच्या माता-भगिनींना, वृद्धांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना आता एसटीने आनंदाचा प्रवास करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -