झापूक झुपूक करत बिग बॉस मराठीच्या घरात ज्यानं एंट्री घेतली तो सूरज चव्हाणचांगलाच राडा करतोय. टिक टॉक स्टार सूरज चव्हाणनं बिग बॉस घरात एंट्री घेत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सूरजनं घरात त्याच्या गोलीगत गेम देखील सुरू केला.
बिग बॉसच्या सहाव्या आठवड्यात सूरजबरोबर जे काही घडलं आहे ते पाहून त्याच्या प्रेक्षकांनी त्यांच्या खऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यावर सूरज चव्हाणच्या नावाने अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून धम्माल करतोय. पहिले दोन आठवडे त्याला खेळ समजून घ्यायला लागले मात्र त्यानंतर सूरजने त्याचा गोलीगत गेम सुरू केला आहे. सूरजच्या गोलीगत गेमला काही दिवसातच चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. गणपणतीच्या आगमनाआधीच सूरज चव्हाणला गुड न्यूज मिळाली आहे.
बिग बॉसच्या घरात नुकताच सहाव्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला. बीबी बस स्टॉपवर जागा मिळवण्यात सूरज चव्हाण, वर्षा उसगावकर आणि अंकिता वालावलकर हे यशस्वी ठरले. दोघांमध्ये कॅप्टन्सीसाठी चुरशीची लढाई झाली. ज्यात सूरज चव्हाणनं यश मिळवलं. सूरज चव्हाण मराठी बिग बॉसचा सहाव्या आठवड्याचा कॅप्टन झाला.
त्याच्या झापुक झुपुकने जिंकलय सगळ्यांचं काळीज जिंकल तो सूरज बिग बॉसचा नवा कॅप्टन झाला आहे. पहिल्या दिवसापासून सूरजला गेम कळत नाही. त्याला काही गोष्टी सारख्या सांगाव्या लागतात. तो कॅप्टन्सीसाठी पात्र नाही असं अनेकदा म्हटलं गेलं मात्र सूरजवर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याला गेम कळतो आणि तो इतरांपेक्षा वेगळा खेळू शकतो हे त्यानं कॅप्टन होऊन सर्वांना दाखवून दिलं आहे.
सूरज चव्हाण कॅप्टन झाल्याचा बिग बॉसनी देखील आनंद व्यक्त केला आहे. सूरज चव्हाणच्या कॅप्टन्सीचा खास व्हिडीओ कलर्स मराठी वाहिनीकडून शेअर करण्यात आला आहे.
गोलीगत सूरज चव्हाण कॅप्टन झाल्यानंतर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. कलर्स मराठीनं शेअर केलेल्या प्रोमोवर चाहत्यांनी कमेंट्सची बरसात केली आहे. बिग बॉस मराठीच्या X स्पर्धक तृप्ती देसाई यांनी लिहिलंय, “wah…… त्याला सगळे डिसिजन घेता येत नाही असे म्हणत होते ,आता तोच कॅप्टन झाला आहे .सगळे डिसिजन तोच घेणार, त्याला सगळ्यात कमकुवत समजणारे फक्त आता बघत बसणार, सुरज तुमचं मनापासून अभिनंदन”
दुसऱ्या चाहत्यानं सूरजसाठी लिहिलंय, “अरे गोलीगत कॅप्टन झाला रे. खरंच गणपतीबाप्पा ना भाऊ मानतो सूरज आणि गणरायाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर कॅप्टन झालाय सुरज.. खूप भारी वाटलं हा प्रोमो बघून.. गणपति बाप्पा मोरया” आणखी एका चाहत्यानं लिहिलंय, “भाऊ मनं जिंकलं… आणि बिग बॉस पण जिंकणार”.