Saturday, November 23, 2024
Homeराशी-भविष्य३० वर्षांनंतर शनी-सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी...

३० वर्षांनंतर शनी-सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी आणि भौतिक सुख

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांचा राजा सूर्य ग्रहाचे प्रत्येक महिन्यातून एकदा राशी परिवर्तन होते. सध्या सूर्य सिंह राशीत विराजमान असून यावेळी सूर्याची दृष्टी शनीवर पडत आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने ऑगस्ट महिन्यामध्ये मिथुन राशीत प्रवेश केला असून या राशीत तो १५ सप्टेंबरपर्यंत विराजमान असेल. त्यामुळे मंगळाचा सूर्य, गुरूसह खास संयोग निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पडेल.

 

शनी-सूर्य देणार भरपूर पैसा (Surya shani gochar 2024)

वृषभ

 

वृषभ राशीमध्ये सूर्य चौथ्या घरात असून शनी दहाव्या भावात विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि शनीचा समसप्तक दृष्टी संयोग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी कधी शुभ तर कधी अशुभ फळ देणारे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक संकटं येतील. पण सूर्याच्या प्रभावाने ती दूर होतील. अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये संघर्षमय वातावरण निर्माण होईल. परंतु सूर्याच्या कृपेने ते देखील दूर होण्यास मदत मिळेल. नवीन गोष्टीं शिकण्यास प्राधान्य द्याल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. शनी आणि सूर्याचा संयोग तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देण्यास फायदेशीर ठरेल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल.

 

मिथुन

 

सूर्य आणि शनीचा प्रभाव मिथुन राशींच्या व्यक्तींवर अनुकूल सिद्ध होईल. सूर्याची दृष्टी भाग्य भावावर असून या ठिकाणी शनीदेव विराजमान आहेत. तसेच देवगुरू बृहस्पती बाराव्या घरात आणि मंगळ तुमच्या लग्न भावामध्ये विराजमान आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल

 

तूळ

 

सूर्य मिथुन राशीच्या अकाराव्या घरात असून शनी पाचव्या घरात आहे. त्यामुळे समसप्तक योग निर्माण होत आहे. एक वर्षानंतर हा शुभ योग निर्माण झाल्याने त्याचा प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -