आता हळूहळू काही स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय तर काहींचा त्यांना राग येतो. गोलंदाज सूरज चव्हाणचा एक मस्त मजेशीर संभाषणाचा व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये तो अंकिता आणि पॅडी दादासोबत गप्पा मारताना दिसतोय. सूरज म्हणतोय, “गाव महत्त्वाचं आहे मला. कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय.
इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो”. त्यावर अंकिता म्हणते, “आपल्या भावनांवर कंट्रोल करणं गरजेचं आहे”. सूरज पुढे म्हणतो, “मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी पुढचं मागचं बघत नाही.
इथे मी स्वतःला खूप कंट्रोल केलंय”.निक्कीच्या कानाखाली मारणं योग्य होतं का? आर्याच्या ॲक्शनवर प्रेक्षकांची रिॲक्शन दरम्यान, सूरज पॅडी दादांची मसाज करताना दिसून येतो. सूरजचा मसाज पाहून पॅडी दादा म्हणतात, “तुला मसाज काय असतो तेच दाखवतो”. ‘बिग बॉस’च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागलेलाआहे.