Friday, November 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी’

इचलकरंजी : गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी’

इचलकरंजी –

इचलकरंजी फेस्टिव्हल 2024 आयोजित ‘मिस अँड मिसेस इचलकरंजी’ स्पर्धेत गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी 2024’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी 2024’ च्या मानकरी ठरल्या. अत्यंत सन्मानाने, उत्साहाने, आनंदाने आणि अभिमानाने या स्पर्धेच्या विजेतेपदाचा क्राऊन मराठीचे सुप्रसिध्द अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या हस्ते दोन्ही विजेत्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रचंड जल्लोष आणि रोषणाईने सारा माहौल दणाणून गेला.

सिनेअभिनेता स्वप्निल जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे आणि इचलकरंजी फेस्टिव्हलच्या संयोजिका सौ. मौश्मी आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके बहाल करण्यात आली. कार्यवाह अहमद मुजावर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना स्वप्निल जोशी यांनी, इचलकरंजीची वस्त्रनगरी बनविण्यात आवाडे कुटुंबियांचे योगदान मोलाचे असून आज इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. इथे येऊन मला आपल्या माणसांत आल्यासारखे वाटते. कारण इथलं पाणी, माणसं, संस्कृती वेगळीच आहे. इथं दोस्ती आणि दुश्मनीसुध्दा अगदी मनापासून केली जाते असे सांगितले.

नव्या रंगात व नव्या ढंगात सादर होणार्‍या इचलकरंजी फेस्टिव्हलच्या वतीने आयोजित मिस अँड मिसेस इचलकरंजी स्पर्धेच्या विजेत्या मानकरी या कौतुक सोहळ्याने भारावून गेल्या. दोन्ही विजेत्यांना 21 हजार रुपये बक्षिसासह क्राऊन प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मिस इचलकरंजी 2024 चा द्वितीय क्रमांक समिधा साळोखे यांनी तर तृतीय क्रमांक सानिका रजपुत यांनी मिळविला. तर मिसेस इचलकरंजी 2024 चा द्वितीय क्रमांक शुभांगी तारळेकर यांनी आणि तृतीय क्रमांक साक्षी पाटील यांनी मिळविला. शिवाय मिस इचलकरंजी गटात मोनिका नाटकर (बेस्ट वॉक), सेजल पाटील (बेस्ट फोटोजेनिक), तनिष्का रेवणकर (बेस्ट ड्रेसिंग), निधी केसरवाणी (बेस्ट पर्सनॅलिटी) आणि रिध्दी पदमुखे (बेस्ट टॅलेंट) तर मिसेस इचलकरंजी गटात पुजा कांबळे (बेस्ट वॉक), सुरभि पाटील (बेस्ट फोटोजेनिक), श्रृति पाटील (बेस्ट ड्रेसिंग), विजया गायकवाड (बेस्ट पर्सनॅलिटी) आणि करिश्मा कांबळे (बेस्ट टॅलेंट) मानकरी ठरल्या. फेस्टिव्हलचे सचिव शेखर शहा यांनी आभार मानले.

यावेळी परिक्षक म्हणून ग्रुमिंग सेशन कोरिओग्राफर चैताली नेहेते, चैतन्य गोखले, दिशा शामवानी, अभिलाष तिखे व अरबाज मुल्ला यांनी काम पाहिले. तर भाग्यश्री शिंदे यांनी सुरेख सूत्रसंचालन करत स्पर्धेत आणखीन रंग भरला. याप्रसंगी संजू शिंदे, मधु शिंदे, प्रकाश दत्तवाडे, सौ. किशोरी आवाडे, सानिका आवाडे, समायारा आवाडे, उर्मिला गायकवाड, नजमा शेख, सपना भिसे, गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, सीमा कमते, अंजुम मुल्ला, सोनाली तारदाळे, शितल सूर्यवंशी आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित

होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -