Thursday, November 21, 2024
Homeब्रेकिंगअनंत चतुर्दशीला मंगळवारी बँका सुरू राहणार की नाही?

अनंत चतुर्दशीला मंगळवारी बँका सुरू राहणार की नाही?

मंगळवारी देशातील अनेक भागात बँका बंद राहणार आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. संपूर्ण भारतात हा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात. या सर्व सुट्ट्या भारतभर असतात असे नाही. ईद-ए-मिलादच्या निमित्ताने 16 सप्टेंबर रोजी भारतातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका काही राज्यांमध्ये बंद होत्या. यामध्ये गुजरात, मिझोराम, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश होता. सिक्कीममध्ये 17 सप्टेंबर रोजी इंद्रजत्रेच्या सुट्टीमुळे बँका बंद राहणार आहेत. याशिवाय अनंत चतुर्दशीनिमित्त राजस्थानमध्ये बँकेला सुट्टी असेल. छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही यानिमित्ताने बँकांचे कामकाज होणार नाही.

मात्र, ऑनलाइन सेवा सुरू राहणार आहेत. सर्व बँका त्यांच्या ऑनलाइन वेबसाइट्स आणि मोबाइल बँकिंग सेवा ॲप्स चालू राहतील. ग्राहक पैसे काढण्यासाठी कोणत्याही बँकेच्या एटीएमचा वापर करू शकतात.

 

बँका कोठे आणि केव्हा बंद राहतील?

18 सप्टेंबर – श्री नारायण गुरु जयंती (बुधवार) – केरळ 21 सप्टेंबर – श्री नारायण गुरु समाधी (शनिवार) – केरळ 22 सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत 23 सप्टेंबर – शहीद दिन (सोमवार) – हरियाणा 28 सप्टेंबर – चौथा शनिवार – संपूर्ण भारत 29 सप्टेंबर – रविवार – संपूर्ण भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -