Friday, March 14, 2025
Homeब्रेकिंगसलमान खानच्या हिरोइनचं थाटामाटात लग्न; पहा खास फोटो

सलमान खानच्या हिरोइनचं थाटामाटात लग्न; पहा खास फोटो

अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटात भूमिका साकारलेली दाक्षिणात्य अभिनेत्री मेघा आकाश नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मेघाने बॉयफ्रेंड साई विष्णू याच्याशी लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

मेघा आणि आकाशने दाक्षिणात्य विवाहपद्धतीनुसार लग्न केलंय. या लग्नसोहळ्यात मोजके कुटुंबीय सहभागी झाले होते. मेघाने सोनेरी आणि आयव्हरी रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. टेंपल ज्वेलरीमुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं.

माझा सर्वोत्कृष्ट मित्र, साथीदार.. असं लिहित मेघाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

मेघा आणि साई विष्णूने 22 ऑगस्ट रोजी साखरपुडा केला होता. या साखरपुड्याला फक्त मोजके कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते. त्यानंतर आता दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे.

मेघाने प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने 2017 मध्ये ‘लाय’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तर ‘पेटा’ या चित्रपटातून तिने तमिळ चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. हिंदीत तिने पहिल्यांदा ‘सॅटेलाइट शंकर’ या चित्रपटात काम केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -