Wednesday, January 15, 2025
Homeराशी-भविष्यशनिदेवाला प्रिय आहेत ‘या’ राशी! प्रत्येक संकटातून काढतात बाहेर; तुमची रास आहे...

शनिदेवाला प्रिय आहेत ‘या’ राशी! प्रत्येक संकटातून काढतात बाहेर; तुमची रास आहे का यात?

ज्योतिष्यशास्त्रानुसार सर्व ग्रहांप्रमाणे शनीदेवही गोचर करतात. शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतात. जेव्हा शनि गोचर करतो तेव्हा काही राशींवर चांगले परिणाम तर काही राशींवर वाईट परिणाम दिसून येतात. शनिदेवाच्या कृपेने गरीब सुद्धा राजा होऊ शकतो. जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक संकटे येतात तसेच जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनि शुभ स्थानी असेल तर त्याचे नशीब उजळते. ज्योतिष्यशास्त्रानुसार, चार असा राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते.

 

ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात बारा राशी असतात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. स्वामी ग्रहाचा राशीवर प्रभाव असतो. कुंभ आणि मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे.

 

तूळ (Libra)

तूळ राशी ही शनिदेवाची सर्वात आवडती राशी मानली जाते, असे मानले जाते की, या राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांना शनिदेव दुःख आणि संकट देत नाहीत.

 

मकर (Capricorn)

मकर राशीचा शासक ग्रह शनि आहे. त्यामुळे शनिदेव या लोकांवर विशेष कृपा ठेवतात. शनिदेव त्यांच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्रदान करतात. शनीच्या साडेसाती आणि धैय्याच्या काळातही शनिदेव मकर राशीच्या लोकांना फारसा त्रास देत नाहीत.

 

धनु (Sagittarius)

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. शनि आणि गुरु यांच्यात एकमेकांशी मैत्रीची भावना आहे. यामुळे धनु राशीच्या लोकांवर शनिदेव नेहमी कृपा ठेवतात. शनीच्या साडेसातीच्या काळातही शनिदेव त्यांना फारसा त्रास देत नाहीत.

 

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनि आहे, यामुळे या लोकांवर शनीची कृपा राहते. या राशीचे लोक शांत आणि प्रामाणिक असतात. त्यामुळे शनिदेव त्यांच्यावर कृपा करतात. तसेच या राशीच्या लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -