Saturday, October 12, 2024
Homeब्रेकिंगगहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार,...

गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा

भारतात (India) आता सणासुदीचा हंगाम (festive season) सुरु होणार आहे. या काळात महागाई (Inflation) वाढू नये म्हणून सरकार (Govt) प्रयत्न करत आहे. कारण या काळात महागाई वाढणार का? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे. अलीकडेच सरकारने खाद्यतेल आणि इतर वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महागाईत वाढ झाली होती. मात्र आता या सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात राहील, म्हणजेच देशातील सर्वसामान्यांवर बोजा वाढणार नसल्याचा दावा सरकारने केलाय. त्यासाठी कमोडिटी उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

 

गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार

सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नसून गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवल्या जातील, असा दावा सरकारने केलाय. उल्लेखनीय आहे की अलीकडेच सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता बळावली आहे. पण, गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात असल्याचा अन्न ग्राहक मंत्रालयाचा दावा दिलासा देणारा आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, मंगळवारीच खाद्यतेल कंपन्यांना तात्काळ किंमती वाढवू नयेत असे सांगण्यात आले आहे.

 

कस्टम ड्युटीत किती वाढ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकतेच कच्च्या आणि शुद्ध तेलावरील कस्टम ड्युटी (खाद्य तेलांवर) वाढवली आहे. सूर्यफूल तेल, पामतेल आणि सोयाबीन तेलावर ही वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत, कस्टम ड्युटीमध्ये बदल केल्यानंतर, नवीन दर 14 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे. क्रूडवर बेसिक कस्टम ड्युटी 0-20 टक्के आहे, तर रिफाइंड तेलावर ते आता 12.5-32.5 टक्के आहे. बेसिक कस्टम ड्युटीमध्ये वाढ केल्यानंतर आता क्रूड ऑईल आणि रिफाइंड ऑइलवरील प्रभावी ड्युटी अनुक्रमे 5.5 टक्क्यांवरून 27.5 टक्के आणि 13.75 टक्क्यांवरून 35.75 टक्के होईल.

जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहणार

या उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांना किंमती वाढवू नयेत, असे निर्देश देण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रयत्नांना यश आल्यास या सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर राहतील असं सरकारनं म्हटलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, उद्योगात 30 लाख टन खाद्यतेल शून्य शुल्कावर आयात केले जाते, जे 45 ते 50 दिवसांच्या घरगुती वापरासाठी पुरेसे आहे. मंगळवारी केंद्र सरकारने खाद्यतेल संघांना 0 टक्के आणि 12.5 टक्के बेसिक कस्टम ड्युटीवर आयात केलेल्या खाद्यतेलाचा साठा उपलब्ध होईपर्यंत तेलाची MRP स्थिर ठेवण्याचा सल्ला दिला होता. सरकार गहू खुल्या बाजारात विकणार नाही, सध्या व्यापाऱ्यांकडे 100 लाख टन गहू उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -