Saturday, October 12, 2024
Homeमहाराष्ट्रफक्त सात रुपयांत सुपरफास्ट इंटरनेट, BSNL च्या 'या' भन्नाट प्लॅनमुळे एअरटेल, जिओचं...

फक्त सात रुपयांत सुपरफास्ट इंटरनेट, BSNL च्या ‘या’ भन्नाट प्लॅनमुळे एअरटेल, जिओचं टेन्शन वाढलं!

देशातील टेलकॉम कंपन्यांनी आपल्या डेटा प्लॅन्समध्ये नुकतीच वाढ केली आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या सर्वच कंपन्यांनी ही वाढ केली आहे. त्यामुळेच हायस्पीड इंटरनेसाठी सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. डेटा प्लॅन्समध्ये वाढ झाल्यामुळे अनेक ग्राहकांनी आपले सिम कार्ड बीएसएनएलमध्ये बदलले आहे.

गेल्या काही दिवसांत बीएसएनएलची इंटरनेट सेवा वापरणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बीएसएनएलने आता एक नवा भन्नाट प्लॅन आणला आहे. या प्लॅनअंतर्गत रोज सरासरी सात रुपये मोजून दिवसाला 3 जीबी डेटा वापरता येणार आहे.

 

BSNL चा 599 वाला रिचार्ज नेमका कोणता आहे?

बीएसएनएलकडून आपल्या धोरणात वेळोवेळी बदल केले जात आहेत. ही सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीकडून आता 4G इंटरनेट सेवा प्रभावीपणे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. BSNL या प्लॅनमध्ये एकूण 84 दिवसांची व्हॅलिडीटी आहे. या प्लॅनअंतर्गत अमर्याद कॉलिंग करता येते. तसेच रोज 100 SMS पाठवता येतात.

विशेष म्हणजे या प्लॅनअंतर्गत रोज 3GB डेटा वारपायला मिळतो. म्हणजेच 599 रुपयांत 84 दिवस सेवा देणारा हा प्लॅन उत्तर इंटरनेट स्पीड देतो. विचार करायचा झालाच तर प्रत्येक दिवसाला फक्त 7.13 रुपये देऊन रोज 3 जीबी डेटा वापरण्याची संधी BSNL ने दिली आहे.

 

कमी किमतीत दमदार बेनिफिट्स

बीएसएनएलच्या युजर्सना हा डेटा प्लॅन आवडत आहे, असे म्हटले जात आहे. म्हणजेच कमी किमतीत युजर्सना चांगले बेनिफिट्स मिळत दिले जात आहे.

 

4G इंटरनेटसाठी उभारले जातेय डेटा सेंटर

BSNL कंपनीकडून आपली इंटरनेट सुविधा सुधारण्यासाठी तसेच या सुविधेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या कंपनीकडून एक 4G डेटा सेंटर उभे केले जात आहे. टाटा उद्योग समुहाच्या मदतीने हे डेटा सेंटर उभारले जात आहे.

या डेटा सेंटरच्या मदतीने बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांना कमी किमतीत चांगल्या प्रतीची इंटरनेट सुविधा देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 2025 सालाच्या मध्यापर्यंत 5जी सेवा चालू करण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -