Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रअरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टन्सी तारणार? भाऊच्या धक्क्याकडे प्रेक्षकांचं लक्ष

अरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टन्सी तारणार? भाऊच्या धक्क्याकडे प्रेक्षकांचं लक्ष

बिग बॉस मराठीच्या घरात आज एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. शनिवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉस मराठी सीझन 5 मधील पहिला वाइल्ड कार्ड सदस्य बॉडीबिल्डर संग्राम चौगुले घराबाहेर गेला. कॅप्टन्सी टास्कमध्ये संग्राम चौगुलेला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला बिग बॉसच्या घरात राहणं आणि पुढील टास्क खेळणं शक्य झालं नसतं. तब्येतीच्या कारणामुळे संग्राम चौगुलेला घराबाहेर पडावं लागलं आहे. दरम्यान, आजही एका सदस्य घराबाहेर जाणार आहे.

 

आज कोण होणार घराबाहेर?

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात या आठवड्यात पाच सदस्य घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, घराबाहेर पडणाऱ्या सदस्याबाबत अंदाज वर्तवला जात आहेत.

 

अरबाज घराबाहेर जाणार की कॅप्टनसी तारणार?

दरम्यान, अरबाज पटेल घराबाहेर जाण्याची नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहे. वैभव चव्हाण घराबाहेर गेल्यानंतर आता अरबाज पटेलची बिग बॉसच्या घराबाहेर पडण्याची बारी असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावर अरबाज पटेलबद्दल नाराजीचा सूर उमटल्याचं दिसत आहे. टीम ए मधील आता फक्त निक्की आणि अरबाज गेममध्ये आहेत, त्यामुळे यापैकी एकाला घराबाहेर काढण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

 

अरबाजबद्दल प्रेक्षकांचा नाराजीचा सूर

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, “अरबाज आणि निक्कीला सोडून वोटींग करा”. दुसऱ्याने म्हटलं, “अरबाजला काढा, निक्की वीक होईल, एकटी पडेल, तिची मनमानी पण चालणार नाही”. आणखी एकाने लिहिलंय, “भावांनो आपल्याला अरबाजला बाहेर काढायचं आहे सुरज, वर्षा ताई, जान्हवी यांना वोट करा”. अरबाज वोटींगमध्ये सगळ्यात शेवटी आहे, पण बिग बॉस त्याला बाहेर काढणार नाहीत. वोटींग फक्त नावाला घेतात. करतात तेच जे बिग बॉसला वाटतं, बघू यावेळी काय करतायेत”, असं म्हणत एका नेटकऱ्याने शंका व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -