Thursday, November 21, 2024
Homeनोकरीअन्न व औषध प्रशासन विभागात भरती, किती पगार मिळणार? अर्ज कुठे करायचा?...

अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, किती पगार मिळणार? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या

सरकारी नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यशाळांमधील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहायक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांमधील पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. वरिष्ठ तांत्रिक सहायक पदाच्या 37 जागा आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदाच्या 19 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

 

 

अन्न व औषध प्रशासनानं या पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी दिला आहे. 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करता येतील. या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतील.

 

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी आणि रसायन शास्त्र किंवा जीव-रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असं आवश्यक आहे.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी प्राप्त केल्यानंतर उमेदवाराकडे औषधी द्रव्ये विश्लेषणाचा दीड वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

 

वरिष्ठ तांत्रिक सहाक पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीतील पदवी असणं आवश्यक आहे. औषध निर्माण शास्त्राचे पदवीधारक विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात.

 

या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपयांचे शुल्क भरावं लागणार आहे. विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदावर निवड झालेल्या उमदेवारांना 38600-122800 वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल. तर, वरिष्ठ तांत्रिक सहायक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 35400-112400 वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.

 

या पदांसाठी अर्ज कुठे करायचा?

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाईटला भेट देऊन उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी भरतीप्रक्रियेसंदर्भातील मूळ जाहिरात आणि नियम व अटी उमेदवारांनी वाचणं आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन विभागानं आता अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा आणि प्रवेशपत्र कधी जाहीर होणार यासंदर्भातील घोषणा नंतर केली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -