Tuesday, April 29, 2025
Homeराशी-भविष्यराशिभविष्य: सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024

राशिभविष्य: सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 23rd September 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजच्या दिवशी एखादं नवीन काम हाती घ्याल. तुम्हाला एखादा दूरचा प्रवास करावा लागेल. घरात पूजाअर्चा आयोजित कराल. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कुणाकडूनही पैसा उदार घेऊ नका. कारण या व्यवहारात तुम्ही फसण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरून काही वाद असतील तर वडिलांशी चर्चा करूनच निर्णय घ्या. कुणालाही विचार करूनच आश्वासन द्या. कारण ते पूर्ण करण्यात समस्या निर्माण होईल.

 

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास राहणार आहे. तुम्ही व्यवसायाशी संबंधित एखादी नवीन योजना आखाल. तुमच्या आजूबाजूला वाद, झगडा झाला तर तुम्ही शांत राहा. तुमच्या आईच्या तब्येतीत चढउतार होईल. असं झाल्यास आईच्या टेस्ट करून घ्या. पैशाच्या खर्चावरून तुम्हाला काही दिवस चिंता सतावेल. एखाद्या सरकारी योजनेचा पूर्ण लाभ घ्याल. नोकरीचा शोध घेणाऱ्यांनी मेहनत घ्या, आज ना उद्या फळ मिळेल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी समस्या घेऊन येणारा असेल. नोकरदारांच्या समस्या मार्गी लागतील. व्यापारातील गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नका. तुमचे हितशत्रू मित्राच्या रुपात येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात पुरेपुर लक्ष द्यावं. नाही तर पुढे पश्चात्ताप होईल. भाऊ-बहीण तुमच्या कामात पूर्ण साथ देतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न पक्कं होण्याची शक्यता आहे.

 

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही ज्या कामात हात टाकाल, त्या कामात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात आज एखाद्या कारणामुळे खटपट होण्याची शक्यता आहे. नोकरीत असणाऱ्यांना सहकाऱ्यांचा त्रास होईल. तुमच्या विरोधकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. एखाद्या कामाची सुरुवात केली तर ते पूर्ण करूनच सोडा.

 

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी चांगला आहे. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या आईकडे मनातील गोष्ट सांगाल. तुमच्या व्यवसायात कुणाला पार्टनर बनवू नका. नाही तर तुमची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या एखाद्या मित्राला मदत करण्यासाठी तुम्हाला पैसा जमवावा लागणार आहे. तुम्ही छोट्यामोठ्या गोष्टींच्या योजनांच्या लाभावर लक्ष दिलं नाही तर तुमच्या हातून बऱ्याच संधी निघून जाण्याची शक्यता आहे.

 

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी तणावग्रस्त राहणार आहे. तुमच्या आरोग्याकडे पूर्णपणे लक्ष द्या. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त राहाल. एखाद्या कामात काही अडचणी आल्या असतील तर त्यात गुंतून राहू नका. आईवडिलांची सेवा करण्यसााठी वेळ काढा. तुम्हाला तुमचं एखादं काम पूर्ण करण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागणार आहे. एखाद्या कायदेशीर प्रकरणासाठी धावपळ वाढेल. नोकरीत कार्यरत असलेल्यांना दुसऱ्या कंपनीतून ऑफर येणार आहे.

 

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असणार आहे. तुमचं एखादं काम मार्गी लागल्याने तुम्हाला आज प्रचंड आनंद होणार आहे. एखाद्या जुन्या चुकीवर तुम्ही आज भाष्य कराल. एखाद्या कामाबाबत तुमच्या मनात जर काही संशय असेल तर ते काम पूर्ण करू नका. व्यवसायानिमित्ताने प्रवास करावा लागणार आहे. नोकरीसाठी पैसा खर्च करणाऱ्यांना अडचणी येऊ शकतात. घरात एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन कराल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे. तुमच्या कला कौशल्याने तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना खूश कराल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली असेल. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे तुम्ही लक्ष द्या. प्रेमप्रसंगात वाद होतील. पण किरकोळ भांडणाकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामाबाबत सजग राहा. आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमचं रखडलेलं काम मार्गी लागेल. तुमच्या कामाबाबत एखादी नवीन योजना तयार कराल.

 

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज तुम्हाला व्यवसायात एखादी मोठी डील करण्याची संधी मिळेल. पण कोणताही करार करताना विचारपूर्वकच निर्णय घ्या. तुमची आर्थिकस्थिती आधीपेक्षा चांगली होईल. तुम्हाला आनंद मिळेल. वडिलांसोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यापारात बुडालेला पैसा मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या करिअरची चिंता सतावेल. आज तुम्ही प्रचंड ऊर्जावान राहाल. पण तुमची ऊर्जा योग्य कामात लावा, तेच तुमच्यासाठी योग्य होईल.

 

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

धाडस आणि पराक्रम गाजवणारा हा दिवस आहे. एखाद्या प्रकरणात विनाकारण डोकं घालू नका. तुमचे शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या नव्या कामाची तुम्ही योजना बनवाल. तुम्ही प्रॉपर्टी डीलिंगचं काम करत असाल तर तुमची एखादी मोठी डील आज फायनल होणार आहे. वरिष्ठ सदस्यांसोबत आज कामानिमित्ताने चर्चा होईल. दाम्पत्य जीवनात माधुर्य राहिल. छोट्या मुलांसोबत काही काळ घालवाल.

 

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

व्यवसायात तुमचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्ही मोठी आर्थिक गुंतवणूक कराल, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुम्ही ज्या कामात हात टाकाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील लोकांसोबत तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. एखाद्या वादविवादापासून दूर राहा. कार्यक्षेत्रातील लोकांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमची तुमच्या मित्रासोबत बऱ्याच काळानंतर भेट होणार आहे.

 

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेत भाग घेतला असेल तर त्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला नवीन ओळख मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होण्याची शक्यता आहे. आज नव्या ओळखी होतील. प्रेमप्रसंगात अपयश येणार आहे. घरात बायकोशी वाद होतील. सासूसासऱ्यांसोबत सूत जमेल. गावाकडे जाण्याचा योग आहे. दूरच्या प्रवासाने दगदग वाढणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -