बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलीये. खुशी कपूर हिचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही.
खुशी कपूर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. खुशी कपूर ही वेदांग रैना याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय. दोघे रिलेशनमध्ये आहेत. वेदांग रैना अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे.
द कपिल शर्मा शोमध्ये करण जोहर हा वेदांग रैना याला खुशी कपूरच्या नावाने छेडताना दिसला. वेदांगच्या आयुष्यात खुशी असल्याचे म्हणताना करण जोहर हा दिसला. हेच नाही तर वेदांगने देखील मान्य केले की, त्याच्या आयुष्यात खुशीआहे
चित्रपटाच्या सेटवर खुशी कपूर आणि वेदांग यांच्यात जवळीक्ता वाढली. हेच नाही तर आता वेदांग रैना हा थेट कपूर खानदानाचा जावई होणार असल्याचेही तूफान चर्चा आहे.
दुसरीकडे खुशीची मोठी बहीण अर्थात जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. दोघे कायमच एकसोबत स्पॉट होताना दिसतात. जान्हवीचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतआहेत.