Saturday, December 21, 2024
Homeमनोरंजनअरबाज ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर जाताच निक्की झाली इमोशनल

अरबाज ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर जाताच निक्की झाली इमोशनल

‘बिग बॉस मराठी’चा हा सीझन प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काय घडतंय? काय बिघडतंय? हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. नुकतंच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील अरबाजचा प्रवास संपला आहे.

 

‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनमधील निक्की आणि अरबाज या जोडीने मात्र प्रेक्षकांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. अरबाजचा प्रवास संपल्याने निक्की भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज बाहेर जात असताना निक्की रडते.

 

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवा प्रोमो समोर आला आहे. यात निक्कीला अरबाजची खूप आठवण येत असल्याचं दिसत आहे. अरबाज तू मला सोडून कुठे गेला आहेस?, असं निक्की म्हणते. तर निक्की अरबाजच्या नावाचाचा कॉफी कप वापरताना दिसत आहे.

 

मी घरात तुझ्या नावाचा कप घेतला आहे…पण तुच नाही आहेस आज… असं निक्की म्हणते. निक्कीची परिस्थिती पाहून जान्हवी किल्लेकर हिने त्यावर कमेंट केली आहे. ही राणी पूर्ण हल्ली आहे, असं जान्हवी म्हणते.

 

बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अंकिता, सूरज, पॅडी आणि डीपी दादा चर्चा करताना दिसत आहे. काल निक्की आणि अरबाजवर जी वेळ आली ती आपल्यावरही येणार, असं अंकिता म्हणते. डीपी पण त्यावर भाष्य करतात. आता दिवस कमी राहिले आहेत, असं डीपी म्हणतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -