वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्रग्रहण ठराविक काळानंतर घडतात, ज्याचा मानवी जीवनावर होतो परिणाम होतो. या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण पितृ पक्ष अमावस्येच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्षकालानंतरच करावे असे मानले जाते. चला जाणून घेऊया ग्रहणाचा काळ आणि त्याचा राशींवर होणारा परिणाम…
या दिवशी वर्षातील लागणार दुसरे सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024 Date)
ज्योतिष पंचांगनुसार, वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण रात्री ९:१४ वाजता सुरू होईल, जे पहाटे ३:१७ वाजता संपेल. त्याचा एकूण कालावधी सुमारे ६ तास ६ मिनिटे असेल. हे सूर्यग्रहण आश्विन महिन्यात किंवा अमावस्या तिथीला होईल. या दिवशी पितृपक्षाची अमावस्या तिथी असेल.
या देशांमध्ये दिसणार सूर्य ग्रहण
वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे तो सूतककाळ लागू होणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग आर्कटिक, अर्जेंटीना, ब्राजील, पेरू, फिजी, चिली, पेरू, होनोलूलू, ब्यूनो आयर्स, अंटार्कटिका आणि अमेरिका आणि दक्षिण प्रशांत महासागर काही भांगामध्ये दिसणार आहे.
तुमच्या राशीवर सूर्यग्रहणाचा काय होईल प्रभाव ?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच, यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळेल. तुम्ही व्यवसायात खूप पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे तुम्हाला अचानक लाभ मिळू शकतात.
सूर्यग्रहण मेष, तूळ आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार नाही. या काळात, हे लोक एखाद्या गोष्टीबद्दल तणावग्रस्त असू शकतात. धनहानी देखील होऊ शकते. यावेळी, काही गोष्टींबद्दल मानसिक अस्वस्थता असू शकते. तसेच, यावेळी आपण काळजीपूर्वक वाहन चालवावे. कारण अपघात होण्याची शक्यता असते.