राज्यातील महिलांचे सक्षमीकरण व्हाव, त्यांचे सबलीकरण व्हावं, महालाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्यातील महायुती सरकारने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजना माहित असेल, परंतु या योजनेशिवाय अजूनही काही योजना महिलांसाठी राबवण्यात येत आहेत त्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल.
यामध्ये अन्नपूर्णा योजना, लाडकी लेक योजना, यांसारख्या योजनांचा समावेश आहे. “ज्या देशात स्त्री प्रगत असते, तो देश वेगाने प्रगत होतो”हा नियम आहे . जगभरात विकसित झालेली राष्ट्रे या नियमाचे पालन करूनच प्रगत झालेली आहेत. हे लक्षात घेऊन केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि महाराष्ट्रात महायुती सरकार यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाकडे, सबलीकरणाकडे आर्थिक उन्नतीकडे शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले आहे.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत आहे. डीबीटीमुळे ही रक्कम थेट महिलांच्या खात्यात जमा होत आहे. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून बहुसंख्य महिलांना योजनेचे पहिले दोन हप्ते प्राप्त झाले आहेत.
काहीही झाले तरी ही योजना बंद केली जाणार नाही असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. सरकारच्या या आर्थिक मदतीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.
आर्थिक अडचणीमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने साडेसात लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महागडे व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत मिळणार आहे. स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे असे पाऊल आहे. या निर्णयामुळे सामान्य कुटुंबातील मुली सुद्धा चांगले शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतील अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.