एअरटेल, जिओ आणि वोडाफोन- आयडिया सारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग केल्यानंतर अनेक ग्राहकांचा कल हा बीएसएनएल कडे वळला आहे. मागच्या २ महिन्यात अनेक ग्राहकांनी आपलं सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केलं आहे. तुम्ही सुद्धा बीएसएनएलचे ग्राहक असाल आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच….. कारण आज आम्ही तुम्हाला अशा एक रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्याची व्हॅलिडिटी तब्बल ५२ दिवसाची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केला कि तुम्हाला ५२ दिवस टेन्शन नाही.
298 रुपयांचा रिचार्ज प्लॅन – BSNL Recharge Plan
आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅन बद्दल सांगत आहोत तो आहे बीएसएनएलचा 298 रुपयांचा रिचार्ज प्लॅन.. ज्या वापरकर्त्यांना कामापुरते इंटरनेट लागत त्या ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) बेस्ट पर्याय ठरेल. 298 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला 1GB इंटरनेट डेटा, १०० एसएमएसची सुविधा मिळते. खास गोष्ट म्हणजे तब्बल ५२ दिवस तुम्ही या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता.
जास्त व्हॅलिडिटी असलेला बीएसएनएलचा आणखी एक रिचार्ज प्लॅन आहे ज्याची किंमत 485 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी तब्बल 82 दिवसांची आहे. या कालावधीत ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डाटा, अमर्यादित कॉलिंग असेल तर 100 एसएमएस फ्री मिळतात. त्याचप्रमाणे या प्लॅनमध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड नेटवर्क मार्फत राष्ट्रीय रोमिंग आणि अमर्यादित कॉलिंग यांचा देखील समावेश असतो.
दरम्यान, मागील काही महिन्यापासून बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जुलै मध्ये बीएसएनएलला तब्बल 29 लाख नवे ग्राहक मिळाले. कंपनीसाठी हि सर्वात मोठी उपलब्धी असून एअरटेल आणि जिओ साठी हा मोठा दणका आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता बीएसएनएल सुद्धा आपलं नेटवर्क आणखी वाढवण्यावर भर देत आहे. बीएसएनएल लवकरच संपूर्ण देशात 4G सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. तसेच देशभरात १ लाख बीएसएनएल टॉवर उभारण्याची सुद्धा कंपनीची योजना आहे. 2025 च्या मध्यापर्यंत BSNL चे जवळपास एक लाख नवीन 4G टॉवर्स बसवले जाणार आहेत.
तसेच या देशातील 25000 गावे याद्वारे जोडली जाणार आहेत. त्यामुळे गावांमध्ये देखील दूरसंचार सुविधा आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. अजूनही अनेक गावांमध्ये BSNL ची सुविधा उपलब्ध नाही. परंतु 2025 च्या मध्यापर्यंत सर्वत्र ही सुविधा उपलब्ध होणार आहे अशी माहिती मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.