Thursday, November 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकंरजी : सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी सौ. वैशाली आवाडे

इचलकंरजी : सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी सौ. वैशाली आवाडे

इचलकरंजी

‘बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उध्दार‘ हे ब्रिदवाक्य असलेल्या ‘सहकार भारती’ च्या महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशाली स्वप्निल आवाडे यांची निवड करण्यात आली आहे.

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे 14 वे त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झाले. यावेळी सहकार भारतीच्या 2024- 2027 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये प्रदेश अध्यक्षपदी दत्ताराम चाळके आणि प्रदेश महामंत्रीपदी विवेक जुगादे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रदेश स्तरावरील विविध नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये अ‍ॅड. जवाहर छाबडा यांची विभाग सहसंघटन प्रमुखपदी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ. वैशाली आवाडे आणि संजय परमणे यांची प्रदेश संपर्कप्रमुखपदी निवडीची घोषणा प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केली. सौ. वैशाली आवाडे यांनी सामाजिक क्षेत्रासह विशेषत: गारमेंट उद्योगात भरीव कामगिरी करत एक वलय निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सहकार भारतीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे.

यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, माजी प्रदेश अध्यक्षा शशीताई अहिरे, महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ, जनता सहकारी बँक पुणेचे अभय माटे, सहकार सुगंधचे भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातील सहकार भारतीचे पदाधिकारी, सक्रीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. वैशाली आवाडे यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -