Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रएसटीच्या चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

एसटीच्या चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

प्रवासी वाहतूक करीत असलेल्या चालक वाहकांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्याचे निश्चित झाल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नक्कीच मदत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे.

 

महत्त्वाचा घटक

 

मुख्यत: एसटी महामंडळाने ऑगस्ट,२०२४ या महिन्यात १६ कोटी ८६ लाख, ६१ हजार रुपये नफा मिळवला आहे. उत्पन्न वाढीत सातत्य राहण्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगीक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

 

योग्य कामगिरी करणार्‍यांना प्रोत्साहन भत्ता

 

विशेषत: प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेले गैरवर्तणुक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नसल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. योग्य कामगिरी करणार्‍या चालक व वाहक ांना रोख स्वरुपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास सदर योजना पुढे चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.

 

उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार

 

Incentive allowance to driver-carriers of ST विविध उपयोजना व अभिनव उपक्रमाव्दारे एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढविण्यास सुरुवात केली आहे. प्रवासी राजा कामगार पालक दिन यासारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या व कर्मचार्‍यांच्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. इंधन बचतीसाठी चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

 

एसटीच्या चालक व वाहकांना प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. अतिरिक्त उत्पन्न आणणार्‍या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात दिल्या जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -