भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड कोर्टाने ठोठावला आहे. संजय राऊतांना माझगाव सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली ते दोन वर्षापूर्वीच प्रकरण काय आहे? ते समजून घ्या.
सोप्या शब्दात समजून घ्या
– मीरा-भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती.
त्यातील 16 शौचालय बांधण्याच कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं.
– बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
– 3.50 कोटी रुपयांपेक्षा अधिकची बिल घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता.
– ओवळा-माजीपाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम विधानसभेत हा मुद्दा मांडला होता.
– तत्कालीन ठाकरे सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असणारे आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
– दोन वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं.
– मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपाना कोर्टात आव्हान दिलं होतं. अखेर खटल्याचा निकाल त्यांच्याबाजूने लागला आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.