धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाचा गळा दाबून खून केल्या प्रकार कोल्हापुरात घडलाय. मुलीला आणि नातवाला दारु पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने धावत्या एसटी बसमध्ये गळा दाबून संपवलं आहे. गडहिंग्लजवरुन कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत हा प्रकार घडलाय. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप शिरगावे असं खून करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. दरम्यान, जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने मिळून संपवलं
मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला सासू-सासऱ्याने मिळून संपवलं आहे. गडहिंग्लजवरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत गळा आवळून खून करण्यात आलाय. दरम्यान सासू-सासऱ्याने जावयाचा मृतदेह बस स्टँडवर नेऊन ठेवला होता. संदीप शिरगावे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर आढळला.
धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाचा गळा दाबून केला खून
मुलीला आणि नातवाला दारू पिऊन त्रास देणाऱ्या जावयाला संपवलं
गडहिंग्लजवरून कोल्हापूरला येणाऱ्या विनावाहक गाडीत गळा आवळला
सासू-सासऱ्याने जावयाचा मृतदेह बस स्टँडवर नेऊन ठेवला
संदीप शिरगावे या तरुणाचा मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर आढळला
जावयाची हत्या करणाऱ्या सासू-सासर्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी भावाने केली होती भावाची हत्या
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमध्ये चांदीचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाची ताच्या भावानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे ( वय 29 रा.गोकुळ शिरगांव) असे या व्यापाऱ्याचे नाव होते. ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे आणि त्याच्या भावामध्ये वडिलोपार्जित संपत्तीच्या झालेल्या वाटणीवरुन वाद सुरु होते. त्यामुळे हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.