Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानShare Market ची हनुमान उडी; विक्रमाची मालिका सुरूच, सेन्सेक्स लवकरच 86 हजार...

Share Market ची हनुमान उडी; विक्रमाची मालिका सुरूच, सेन्सेक्स लवकरच 86 हजार अंकाचा टप्पा ओलांडणार

भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांनाच नाही तर जगातील अनेक बाजारांना धक्का दिला आहे. स्टॉक मार्केटने सलग 8 व्यांदा तेजीचे सत्र आहे. BSE चा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने 57 अंकांच्या उसळीसह आज 85,893 अंकांचा टप्पा गाठला. तर एनएसई निफ्टी 32 अंकासह 26,248 अंकावर उघडला. या नवीन घडामोडींमुळे शेअर बाजाराची घौडदौड सुरूच असल्याचे दिसून आले. बाजार लवकरच एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

86,000 टप्पा गाठणार

 

सेन्सेक्स आज मोठा टप्पा गाठणार असा अंदाज बाजार उघडण्यापूर्वीच तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. आज बाजाराच्या पूर्व सत्रात त्यांचे संकेत मिळाले. त्यानंतर बाजार उघडताच दोन्ही निर्देशांकाची घोडदौड सुरू झाली. आज दिवसभरात सेन्सेक्स 86,000 अंकांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. गुरुवारी अमेरिकेतील शेअर बाजार S&P 500 विक्रमी उच्चांकावर पोहचला होता. तर आशियाशी बाजारात पण तेजीचे संकेत मिळत आहेत. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 85,893 अंकांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे 86,000 अंकांचा टप्पा गाठणे अवघड नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या 9 वाजून 47 मिनिटाला सेन्सेक्स 85,866 अंकावर ट्रेडिंग करत आहे.

भारतीय शेअर बाजाराचा बेंच मार्क इंडेक्स सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी सर्वकालीन उच्चांक गाठला. सेन्सेक्स एकावेळी तर 85,930.43 अंकावर पोहचला होता. दिवसभरात 666.25 अंकांची भरारी घेत तो बाजार बंद होताना 85.835.12 अंकावर स्थिरावला. निफ्टी 50 ने 26,250.90 अंकांचा टप्पा गाठला. दिवसभरात 211.90 अंकांसह निफ्टी 26,216.05 अंकावर बंद झाला.

 

जागतिक संकेत काय?

 

Wall Street मध्ये तेजीचे गाणे वाजताच आशियात पण तेजीची धून वाजली. आशियातील बाजारात शुक्रवारी, बाजाराच्या अखेरच्या सत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटली. जापानचा निक्केई 225 अंकांनी वधारला. तर टॉपिक्स 0.23 टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियातील कोस्पी 0.18 टक्क्यांनी उतरला. कोस्डॅक बाजार 0.15 टक्क्यांनी घसरला. हाँगकाँगचा सेंग इंडेक्स फ्यूचर्सने तेजीचे संकेत दिले.

 

सेन्सेक्सचा जादुई 1 लाखांचा आकडा गाठण्यासाठी बाजाराला 17.5% ची उसळी घ्यायची आहे. रोज जर बाजाराने एक टक्क्यांची उडी घेतली तर हा आकडा बाजार 18 ट्रेडिंग सेशनमध्ये पूर्ण करेल. पण सध्या लागलीच हा चमत्कार होण्याची शक्यता धूसर आहे. डेझर्व्हचे सहसंस्थापक वैभव पोरवाल यांच्या मते, बाजाराला प्रति वर्ष 12-15% रिटर्न द्यावा लागेल. त्यामुळे 1,00,000 हा टप्पा गाठण्यासाठी बाजाराला 18-24 महिने लागतील

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -