ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. नवग्रहामध्ये शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून आता त्याची दृष्टी ग्रहांचा राजा सूर्यावर पडत आहे. ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण झाला आहे. शनीच्या सूर्यावरील दृष्टीमुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तर काही राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभही होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात, अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते.
दोन राशीच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग नुकसानदायक
कर्क
षडाष्टक योग कर्क राशीच्या व्यक्तींना नकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या राशीत ग्रहांचा राजा सूर्य तिसऱ्या घराचा स्वामी असून तो कर्क राशीच्या चौथ्या घरात गोचर करत आहे. तसेच या घरात केतूदेखील विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा.
कन्या
षडाष्टक योग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक अडचणी निर्माण करणारा असेल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सांभाळून चालवा. तसेच या काळाता कुटुंबात कोणतेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
शत्रूंपासून सावध राहा आणि मनातील गोष्टी इतरांना सांगण्याआधी विचार करा. आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापासून दूर रहा.