Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रअरे देवा! ऑक्टोबरच्या 'या' कालावधीत राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता;

अरे देवा! ऑक्टोबरच्या ‘या’ कालावधीत राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता;

गेल्या चार ते पाच दिवसापासून राज्यामध्ये परतीच्या पावसाने जोर पकडल्याची स्थिती होती व काढणीला आलेल्या कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांचे यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या.

 

 

परंतु राज्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने जे काही धुमशान घातलेले होते

 

ते आता काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे व आजपासून राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबरावांनी दिलेली आहे.

 

शेतकऱ्यांसाठी हा एक समाधानकारक अंदाज असून काढणीला आलेल्या पिकांची काढणी करणे आता शेतकऱ्यांना सोपे होणार आहे. त्यामुळे पंजाबरावांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की राज्यामध्ये सध्या सर्वदूर पाऊस पडणार नसल्याने शेतकऱ्यांनी सहा ऑक्टोबर पर्यंत शेतातील सर्व कामे उरकून घेणे गरजेचे आहे व सोयाबीन तसेच उडीद पिकांचे काढणी करून घ्यावी अशा प्रकारचे आवाहन पंजाबरावांनी केले आहे.

 

ऑक्टोबरच्यासहातेनऊतारखेपर्यंतराज्यातजोरदारपावसाचीशक्यता

 

सध्या राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नसल्याचा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला असून त्यासोबतच मात्र 10 ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. परंतु त्यासोबत काही ठिकाणी जास्त वेळ पाऊस पडणार नाही पण अचानक पाऊस येण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे.

 

28 सप्टेंबर पासून आठवडाभर म्हणजेच 5 ऑक्टोबर पर्यंत खानदेश, अहमदनगर, नासिक, पुणे तसेच सातारा व सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर व मराठवाडा मिळून 18 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून हळूहळू स्वरूपात पावसाचा जोर काहीसा कमी होईल अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

 

तसेच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडेल अशी शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या माध्यमातून देखील वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई तसेच कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाच्या उघडीपीची परिस्थिती एक ते पाच ऑक्टोबर दरम्यानच्या कालावधीत जाणवू शकते असे देखील माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

 

ऑक्टोबरमहिन्यामध्येकशीराहीलपावसाचीस्थिती?

 

ऑक्टोबरच्या सहा तारखेनंतर राज्यामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून 13 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात मध्यंतरी जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माणिकराव खुळे यांनी देखील म्हटले आहे. परंतु जमेची बाब म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो असे देखील महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे.

 

चक्रीवादळाचा सिझन चालू होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही असे देखील माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -