Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगली : पावणेदोन कोटीचे सोने लंपास करणार्‍यास अटक

सांगली : पावणेदोन कोटीचे सोने लंपास करणार्‍यास अटक

केरळ येथील थ्रिसूरमधून एक कोटी 80 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भिवघाट (ता. खानापूर) येथे अटक केली.

विश्वास रामचंद्र कदम (वय 34, रा. कौठुळी, ता. आटपाडी) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित कदम याचा केरळमधील थ्रिसूरमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क करून देण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात त्याची पत्नी स्नेहल कदम व इतर दोघेजण भागीदार आहेत. थ्रिसूरमधील सराफी व्यावसायिक सदानंदन पोनापन्न यांनी एप्रिल 2024 मध्ये विश्वास कदम याला एक कोटी 80 लाख रुपये किमतीचे 2255.40 ग्रॅम सोन्याचे दागिने हॉलमार्कसाठी दिले होते. पण विश्वास कदम ते दागिने घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी थ्रिसूर पोलिस ठाण्यात कदम याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी केरळ पोलिसांचे पथक सांगलीत आले होते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी संशयिताचा शोध घेण्याची सूचना एलसीबीच्या पथकाला दिली होती. त्यानुसार एलसीबीचे पथक संशयिताचा शोध घेत असताना, विश्वास कदम हा भिवघाट येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत पावणेदोन कोटीचे सोने थ्रिसूरमध्येच विकल्याची कबुली दिली. त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कारवाईत एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज

पवार, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, सूर्यकांत साळुंखे, सागर टिंगरे, हणमंत लोहार, कुबेर खोत, सुनील जाधव, कॅप्टन गुंडेवाडे, करण परदेशी यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -