Thursday, October 3, 2024
Homenewsनाशिकचे 'पांडेजीं'च्या बदलीची शक्यता; नारायण राणेंवरील कारवाई भोवणार?..

नाशिकचे ‘पांडेजीं’च्या बदलीची शक्यता; नारायण राणेंवरील कारवाई भोवणार?..


केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan rane) यांच्यावर गुन्हा दाखल करून देशभरात चर्चेत आलेल्या नाशिकच्या दबंग पोलीस आयुक्तांच्या बदलीची शक्यता व्यक्त होत आहे. संजय राऊत आणि पर्यायाने शिवसेनशी असणाऱ्या त्यांच्या जवळीकमुळेच दीपक पांडेच्या बदलीसाठी दबाव वाढत असल्याची चर्चा आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त हे नाशिककरच नाहीत तर देशभरात चर्चेत आलेत. 1999 च्या बॅचचे ips अधिकारी असणारे दीपक पांडे यांनी 4 सप्टेंबर 2020 मध्ये नाशिक पोलीस आयुक्तलयाचा कारभार हाती घेतला. तेव्हापासूनच त्यांची कारकीर्द गाजत आहेत. पदभार स्वीकारतात त्यांनी पोलिसांसाठी कोव्हिड सेंटरची निर्मिती केली. पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय सुदृढ राहतील तरच पोलीस गुन्हेगारीचा बिमोड करू शकतो त्यामुळे गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी पांडे यांनी कोव्हिड सेंटरकडे लक्ष दिले. कोरोना काळात ग्रीन ज्यूसचे धडे देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही ग्रीन ज्यूस पिण्यास भाग पाडले. जेव्हा त्यांनी कामाला सुरवात केली तेव्हा उघड उघड महसूल विभागाला अंगावर घेतलेय शहरातील जुगार मटका अड्यावर करावाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे पोलिसांची नाही गरज पडली तर आम्ही बंदोबस्त देऊ असा दावा केल्यानं दोन्ही खात्यात वाद निर्माण झाला. विभागीय महसूल आयुक्तांच्या कोर्टात हा वाद सोडविण्यात आला. शहरातील भुमाफिया विरोधात पांडे यांनी मोक्का अंतर्गत करावाई करून अद्दल घडवली, शहरातील गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत गुन्हेगार सुधार योजना राबवली तर त्याच वेळी अट्टल गुन्हेगारांना 100 हून अधिक गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत करावाई केली. मोर्चे आंदोलन करणाऱ्या राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करत कोणाचीही भीडभाड न ठेवता दबंगगिरी सुरूच ठेवली, तोच प्रत्यय नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करताना दिसला. राज्यात कुठे नाही पण नाशकात थेट केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला.

दबंग पोलीस अधिकारी दीपक पांडे यांची 12 वर्षाची सेवा बाकी असून कारकिर्द संघर्षमय आणि अनेक चढ उताराची राहिली आहे. नागपूरमध्ये प्रशिक्षण घेत सेवा सुरू करणारे पांडे यांनी गडचिरोली, रत्नागिरी, अकोला या जिल्ह्यासह राज्य राखीव दलात ही सेवा बजावली. कौटुंबिक वादानंतर 4 वर्ष दीपक पांडे निलंबित ही राहिले आहेत.नाशिकला येण्याआधी कारागृहाचे आयजी ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.


मात्र शिवसेनेशी असणारी सलगी त्यांच्या पुढील कारकिर्दीत अडचणी आणू शकतात. नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करणे, भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनिक 5 दिवस फरार असणे, संजय राऊत यांनी दीपक पांडे यांची भेट घेणं, पांडे यांच्यां कार्य पद्धतीचे राऊत यांच्यांकडून खुलेआम कौतुक करणं, या सर्व घडामोडी केवळ योगायोग असतील का याबाबत अनेकांच्या मनात शंका निर्माण होईल अशाच आहे.आपल्या कार्यपद्धतीने दीपक पांडे कायमच चर्चेत राहिले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात हिरो तर काही अधिकाऱ्यांना त्यांचा कारभार खटकत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -