Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 'या' तारखेपासून पुन्हा एकदा धो-धो

महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा धो-धो

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. या नवीन अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार, पावसाची विश्रांती राहणार परंतु नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

 

खरे तर, गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.

 

अगदीचं तुरळक ठिकाणी हलका पाऊस सुरु आहे. पण गेल्या तीन-चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात कुठेच मुसळधार पावसाची नोंद करण्यात आलेली नाही. यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र शेतीकामांनी गती पकडली आहे. सध्या राज्यात सुगीचे दिवस सुरू आहेत.

 

विविध पिकांची हार्वेस्टिंग केली जात आहे. सोयाबीन, उडीद सारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे तर कापूस वेचणी देखील सुरू झाली आहे. अशातच पंजाब रावांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. डख यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या कालावधीत हवामान कोरडे राहणार असे म्हटले आहे.

 

तथापि या काळात राज्यातील काही भागांमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण, पावसाचा खरा जोर हा 5 ऑक्टोबर नंतरचं पाहायला मिळेल. पुढील महिन्याच्या पाच तारखेनंतर महाराष्ट्रातील हवामान चेंज होणार आहे.

 

पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार अशी शक्यता आहे. 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आगामी पाच-सहा दिवसात काढणी योग्य पिकांची काढणी पूर्ण करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन केले आहे.

 

पंजाबरावांनी महाराष्ट्रात समवेतच मध्यप्रदेश राज्यात देखील ६ ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी देखील आगामी पाच-सहा दिवसात शेतीची कामे उरकून घ्यावीत असा सल्ला त्यांनी दिला आहे.

 

आज अन उद्या महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. परंतु दोन ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी पावसाचा जोर कमी राहील. दरम्यान सहा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढणार आहे.

 

सहा ते आठ ऑक्टोबर तसेच काही भागात नऊ ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सुद्धा महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. पुढील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातील 23, 24 आणि 25 ऑक्टोबरला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सुद्धा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

तदनंतर नोव्हेंबर महिन्यात पाऊस गायब होणार आहे. यंदा 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामांना वेग द्यावा आणि शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला पंजाबरावांनी यावेळी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -