वाठार वारणानगर राज्य मार्गावर नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील वाडकर खोरीत नितीन मानसिंग भोसले (वय ३०, रा. वारणानगर) याचा आज सकाळी नवे पारगाव येथे मोटरसायकलसह मृतदेह मिळून
आला.
प्रथम दर्शनी त्याचा खून केला असावा, अशी शंका आल्याने वडगाव पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी समांतर तपास केला. तपासादरम्यान काही इसमांना ताब्यात देखील घेण्यात
आले. दरम्यान मयत नितीन भोसले यांचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मयत इसमाचे डॉ. श्रीमती गावडे यांनी शवविच्छेदन केले असता मयत नितीन भोसले याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच मयत नितीन भोसले याचे अंगावर भाजल्याच्या तसेच फुफ्फुस देखील जळाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नितीन भोसले याचा खून झाला नसून त्याचे अंगावर बीज पडून नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.