Wednesday, October 16, 2024
Homeमनोरंजनबिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण? जाणून घ्या आतापर्यंत कुणी कुणी उचलली...

बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण? जाणून घ्या आतापर्यंत कुणी कुणी उचलली ट्रॉफी

‘बिग बॉस मराठी 5’ ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

 

‘बिग बॉस मराठी’चा विजेता होण्याचे घरातील प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र त्यापैकी कोणा एकाचे स्वप्न पूर्ण होते. असेच आज आपण ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या चार स्पर्धकांविषयी जाणून घेणार आहोत.

 

मेघा धाडे

 

‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व अभिनेत्री मेघा धाडे (Megha Dhade ) हिने गाजवले होते. ती पहिल्या पर्वाची विजेता राहीली आहे. तिने अनेक तगड्या स्पर्धकांना मात करून विजेते पद मिळवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेघाला 18 लाख 60 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच तिला एक आलिशान घरही देण्यात आले. या शोमध्ये मेघाची मैत्री सई लोकूरसोबत झाली. आजही त्या दोघी छान मैत्रिणी आहेत. त्यानंतर मेघा ‘बिग बॉस हिंदी’ च्या १२व्या पर्वात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली. सध्या मेघा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

 

शिव ठाकरे

 

शिव ठाकरेने (Shiv Thakare) ‘बिग बॉस मराठी 2’ पर्व गाजवलं आहे. तो बहुमतांनी ‘बिग बॉस मराठी 2’ चा विजेता ठरला आहे. त्यांच्या साधेपणामुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. या पर्वात वीणा जगताप आणि शिवमध्ये चांगली मैत्री झालेली पाहायला मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार, शिवला ‘बिग बॉस मराठी 2’ जिंकल्यावर 25 लाख रुपये देण्यात आले. मात्र शेवटी त्याच्या हातात 11 लाखाच्या जवळपास रक्कम आली. ‘बिग बॉस मराठी’ नंतर शिव देखील हिंदी बिग बॉसमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर शिव ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये पाहायला मिळाला. ‘रोडिज 15’ आणि ‘झलक दिखला जा 11’ व्या सीझनमध्ये झळकला. या सर्वामुळे शिवला खूप लोकप्रियता मिळाली.

 

विशाल निकम

 

‘बिग बॉस मराठी 3’ चा विजेता विशाल (Vishal Nikam) निकम ठरला. त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तो अनेक वेळा मुख्य भूमिकेतही दिसला आहे. आपल्या युक्तीच्या बळावर विशालने हे पर्व जिंकले. विशाला ‘बिग बॉस मराठी 3’ जिंकल्यावर 20 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली. ‘बिग बॉस मराठी ‘ नंतर विशाल अनेक अल्बम साँगमध्ये झळकला. सध्या विशाल ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत दिसत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातही काम केलं आहे.

 

अक्षय केळकर

 

‘बिग बॉस मराठी 4’ चा विजेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) झाला. त्यांनी अनेक मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी ‘बिग बॉस मराठी ‘ नंतर ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं. अक्षय केळकर 15 लाख 55 हजारचा धनादेश मिळाला. तर अक्षय सीझनचा बेस्ट कॅप्टन ठरल्यामुळे त्याला 5 लाख रुपये मिळाले. तसेच सोन्याचे ब्रेसलेट देखील मिळाले. अक्षयने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -