आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सातव्या सामन्यात आज 6 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाचं नेतृत्व करणार आहे. तर फातिमा सना हीच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची धुरा आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन फातिमा सना हीने बॅटिंगचा निर्णय घेतला.
पाकिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 बदल केला आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत विजयी सुरुवात केली. तर टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियासाठी पाकिस्तान विरुद्धचा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे. त्यामुळे या सामन्यात महिला ब्रिगेड कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ
आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 15 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने या 15 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. तर टी 20 वर्ल्ड कपमध्ये उभयसंघ एकूण 7 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानला 2 वेळा यश आलं आहे. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने टीम इंडियाच सरस आहे.
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानची बॅटिंग रोखणयाचं आव्हान
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : फातिमा सना (कॅप्टन), मुनीबा अली (विकेटकीपर), गुल फिरोजा, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा आरूब शाह आणि सादिया इक्बाल.